ग्रेटर नोएडातील सिरसा गावातील रहिवासी निक्की भाटीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी निक्कीच्या खोलीतून ज्वलनशील द्रव जप्त केला आहे, जो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच २१ ऑगस्टच्या घटनेशी संबंधित अनेक छोट्या व्हिडीओ क्लिप्सही समोर आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण तपासाची आता दिशा बदलली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सासू दयावती तिचा मुलगा विपिन आणि सून निक्कीला भांडताना वेगळं करताना दिसत आहेत. निक्कीची बहीण कांचनने शूट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, "तू काय केलंस?" असा आवाज ऐकू येतो. हे विधान आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचा नव्याने तपास केला जात आहे.
न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
कांचनने या प्रकरणात एफआयआर दाखल केली. तिने असा दावा केला होता की, तिच्यासमोर निक्कीला तिचा पती विपिन, सासरा सत्यवीर, सासू दया आणि दीर रोहित यांनी मारहाण केली आणि नंतर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळलं. पोलिसांना ज्वलनशील पदार्थाचे नमुने मिळाले आहेत, त्यामुळे आरोप आणि सत्य वेगळं असू शकतं हे सिद्ध होतं.
निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
पोलीस तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील सापडले आहे. यामध्ये घटनेपूर्वी विपिन त्याच्या घराबाहेर उभा असल्याचं दिसून येतं. याशिवाय ग्रेटर नोएडाच्या जारचा भागात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोंदवलेल्या एका जुन्या गुन्ह्याचीही चौकशी केली जात आहे, ज्यामध्ये विपिनवर प्रीती नावाच्या मुलीला मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप होता.
"दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
निक्की आणि कांचनचे वडील भिखारी सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी जिवंत जाळण्यात आलं. सासरच्यांनी ३६ लाख रुपये आणि कारची मागणी केली असल्याचं देखील सांगितलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.