ग्रेटर नोएडातील सिरसा गावातील रहिवासी निक्की भाटीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारण्यात आलं. याच दरम्यान आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निक्कीचे वडील भिखारी सिंह यांच्या कुटुंबाला देखील पैशांची खूप हाव असून त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ केल्याचा आरोप आता सुनेने केला आहे.
निक्कीच्या कुटुंबाने तिची वहिनी मीनाक्षीला हुंड्यासाठी घराबाहेर हाकलून दिलं. मीनाक्षीने दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये हुंड्यासाठी तिचा खूप छळ केला जात होता. मीनाक्षीच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, निक्की भाटीच्या कुटुंबाने त्याच्याकडे स्कॉर्पिओ एसयूव्हीचं नवीन मॉडेल आणि रोख रक्कम मागितली होती. मात्र त्यांनी यासाठी नकार दिल्यावर सासरच्यांनी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी परत पाठवलं.
निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
मीनाक्षीचं लग्न २०१६ मध्ये रोहितशी झालं होतं. मीनाक्षीच्या आईवडिलांनी हुंड्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने तिला सासरच्या घरातून हाकलून लावण्यात आलं आणि माहेरी पाठवण्यात आलं. हे प्रकरण नंतर गावपंचायतीत पोहोचलं. पंचायतीत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की मीनाक्षीच्या लग्नात खर्च झालेले ३५ लाख रुपये तिच्या कुटुंबाला परत करावेत जेणेकरून ती पुन्हा लग्न करू शकेल किंवा तिच्या पतीच्या कुटुंबाने तिला स्वीकारवं. मात्र हा वाद अद्याप मिटू शकलेला नाही आणि मीनाक्षीचा छळ सुरूच आहे.
न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
निक्की भाटीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी निक्कीच्या खोलीतून ज्वलनशील द्रव जप्त केला आहे, जो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच २१ ऑगस्टच्या घटनेशी संबंधित अनेक छोट्या व्हिडीओ क्लिप्सही समोर आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण तपासाची आता दिशा बदलली आहे.