शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरेला न्यायालयीन कोठडी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:39 IST

Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचें अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून, वेळ आली आहे बारामतीच्या गांधी  साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे या तरुणाविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचें अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून, वेळ आली आहे बारामतीच्या गांधी  साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे या तरुणाविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला बुधवारी रात्री नोपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते.  निखिलला गुरुवारी ठाणे न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली आहे. त्यानंतर निखिलला घेऊन पोलीस नाशिकला रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या प्रकरणी नौपाडा पोलिसात फिर्याद दाखल केली होती.

 मागील आठवड्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक रिट्विट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पवारांना उद्देशून धमकी देणारी वादग्रस्त मजकूर होता. निखिल भामरे नामक नेटकऱ्याने ही पोस्ट ट्विट केली होती. त्यात वेळ आली आहे बारामतीच्या गांधी  साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे या पोस्ट मध्ये लिहले होते. या पोस्टचा स्क्रीनशॉट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नौपाडा पोलिसात फिर्याद नोंदवल्याने पोलिसांनी भामरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भामरे याला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी ठाण्यात झालेल्या गुन्ह्याप्रकरणी  नौपाडा पोलिसांनी नाशिक येथून त्याचा ताबा घेतला. त्याला रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायमूर्तीनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन नाशिकला रवाना झाले.

टॅग्स :Courtन्यायालयSharad Pawarशरद पवारSocial Mediaसोशल मीडिया