शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी; पैसे, दागिने घेऊन पळाली; संतापलेल्या भावाने केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:02 IST

काकाच्या प्रेमात पुतणीने पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथे काकाच्या प्रेमात पुतणीने पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी प्रियकर काकावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या काही लोकांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

तरुणीही यानंतर तिच्या प्रियकराजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एसपी अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर त्याच्या पुतणीवर प्रेम करत होता, दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. हे प्रकरण नरैनी कोतवाली भागातील एका गावाशी संबंधित आहे. येथे राहणारा तरुण आणि त्याच परिसरात राहणारी त्याची पुतणी यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. 

रविवारी रात्री प्रेयसीने घरातून पैसे आणि दागिने घेऊन प्रियकराच्या घरी गेली. मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. रात्री उशिरा ही तरुणी प्रियकराच्या घरी सापडली. यानंतर नातेवाईक तरुणीला घेऊन घरी जात होते. दरम्यान, अचानक कशावरून तरी वाद झाला. मुलीचे काही नातेवाईक मुलीला घेऊन घरी गेले. मात्र, तरुणीचा भाऊ प्रियकरासह शेतात गेला.

प्रियकराला बेदम मारहाण केली. संधी मिळताच प्रियकराने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणीच्या भावाने त्याच्यावर  गोळीबार केला. गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. याप्रकरणी एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा म्हणाले, रविवारी रात्री नारायणी पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीत समोर आले की, मुलगी तरूणाची पुतणी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी