शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:20 IST

Sachin Vaze : आता वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर हि सहावी गाडी ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देही आऊटलँडर कार कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. कामोठे परिसरातील शीतलधारा सोसायटी आवारात MH ०१, AX २६२७ या क्रमांकाची गाडी जप्त केली आहे. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ५ गाड्या जप्त केल्या आहेत. आता वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर हि सहावी गाडी ताब्यात घेतली आहे. कामोठे परिसरातील शीतलधारा सोसायटी आवारात MH ०१, AX २६२७ या क्रमांकाची गाडी जप्त केली आहे. 

ही आऊटलँडर कार कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. NIA ची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत NIA ला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा,स्फोटक सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अशा ६ गाड्या सापलेल्या आहेत. एनआयए अजूनही या ६ गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात आहे. जप्त करण्यात आलेली पाचवी मर्सिडीज गाडीचा रजिस्टर नंबर हा नवी मुंबई आरटीओमधला असून पुढील तपास एनआयएकडून केला जात आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्याकडून एनआयएच्या पथकाने २ शर्ट जप्त केले. तसेच सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती हा दुसरा कोणी नसून सचिन वाझे असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार जप्त करण्यात आलेल्या पाचव्या मर्सिडीज गाडीद्वारे अंबानी यांच्या इमारतीबाहेरील रोडवरील परिसराची रेकी १५ दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती.

Sachin Vaze : मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स जप्त; सचिन वाजेंना घेऊन सर्च ऑपरेशन 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीcarकारNavi Mumbaiनवी मुंबई