NIA raids in UP; Two women are in custody | NIA चा वर्ध्यात छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात 
NIA चा वर्ध्यात छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात 

ठळक मुद्देतपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे ४ वाजता छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या या महिलांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

वर्धा - नजीकच्या प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैद्राबाद येथील अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. जुन्या प्रकरणामध्ये या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली जात असल्याचे बोलले जात असून अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. 

पहाटे ४ वाजता छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या या महिलांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे बंद खोलीत त्यांना विचारपूस केली जात आहे. एनआयएच्या या चमूमध्ये एका उपपोलीस अधीक्षकासह दोन पोलीस निरीक्षक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच वर्धा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वत: सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठले होते. सध्या चौकशी सुरू असून चौकशी पथकातील अधिकारी व स्थानिक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी गुप्तता बाळगली जात आहे. 

२०१६ मधील त्या गुन्ह्याचा तपास?

आयएसआयएसशी संबंध असल्या प्रकरणी केस आरसी ४/२०१६/एनआयए/डीएलआय या दाखल गुन्ह्याचा तपासाचा एक भाग म्हणून वर्ध्यांत छापा टाकून सदर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी नेमकी ही कारवाई कुठल्या अनुषंगाने आहे याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

एनआयएची चमू वर्धेत येत त्यांनी चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतले आहे. ते जुन्या एका प्रकरणात चौकशी करीत आहेत. परंतु, ते प्रकरण नेमके काय हे आम्हालाही सहज सांगणे कठीण आहे. शिवाय या प्रकरणी आम्ही काही बोलणे योग्य होणार नाही. - डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा

NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात 


Web Title: NIA raids in UP; Two women are in custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.