NIA Arrest Shimla SP: एनआयएची मोठी कारवाई! लष्कर ए तोयबाशी संबंध, शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:54 PM2022-02-18T19:54:45+5:302022-02-18T19:55:12+5:30

NIA Arrest Shimla SP Arvind Negi: एनआयए 6 नोव्हेंबर 2021 रोजी नोंदवलेल्या ओव्हर ग्राउंड वर्कर्स नेटवर्क प्रकरणाची चौकशी करत आहे. यामध्ये लष्करच्या दहशतवाद्यांना स्थानिक मदत पुरवल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

NIA Arrest Shimla SP: Big action of NIA! Shimla Superintendent of Police arrested in connection with Lashkar-e-Toiba | NIA Arrest Shimla SP: एनआयएची मोठी कारवाई! लष्कर ए तोयबाशी संबंध, शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक 

NIA Arrest Shimla SP: एनआयएची मोठी कारवाई! लष्कर ए तोयबाशी संबंध, शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक 

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक केली आहे. या एसपींचे नाव अरविंद दिग्विजय नेगी असे आहे. त्यांच्यावर गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह एनआयएने ५ अन्य लोकांना अटक केली आहे. 

एनआयए 6 नोव्हेंबर 2021 रोजी नोंदवलेल्या ओव्हर ग्राउंड वर्कर्स नेटवर्क प्रकरणाची चौकशी करत आहे. यामध्ये लष्करच्या दहशतवाद्यांना स्थानिक मदत पुरवल्याप्रकरणी तपास सुरू आहे. या दहशतवाद्यांना भारतात भयंकर हल्ले करण्यासाठी मदत करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एजन्सीने 6 जणांना अटक केली आहे.

तपासादरम्यान एजन्सीला नेगी यांची भूमिका संशयास्पद वाटली. त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे. या अधिकाऱ्यावर गोपनिय कागदपत्रे लीक केल्याचाही आरोप आहे. नेगीने हे दस्तऐवज ओव्हर ग्राउंड कामगारांसोबत शेअर केले होते, ज्यांचे लष्करशी संबंध असल्याचे सांगितले जाते.
 

Web Title: NIA Arrest Shimla SP: Big action of NIA! Shimla Superintendent of Police arrested in connection with Lashkar-e-Toiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.