शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी लग्नासाठी ५० वर्षीय व्यक्तीने लपवला धर्म, पोलीस असल्याची केली बतावणी, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:40 IST

झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी ५० वर्षीय व्यक्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी ५० वर्षीय व्यक्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच त्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी केली होती, हे सर्व समोर आल्यानंतर मुलीच्या घरच्यांना धक्का बसला. ही घटना झारखंडमधील बाकोरा येथील आहे. मुलीला कळले की तिचा होणारा पती दुसर्‍या धर्माचा आहे, इतकंच नाही तर स्वतःला पोलीस म्हणवणारी ही व्यक्ती यापूर्वीच तुरुंगात गेली आहे. 50 वर्षीय अस्लमने अल्पवयीन हिंदू मुलीशी तिच्या कुटुंबाची फसवणूक करून लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी फरार आहे. 

हे प्रकरण हरला पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. गुरुवारी, ८ डिसेंबरच्या रात्री दोघांचे लग्न होणार होते. आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचला. यावेळी तेथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस येईपर्यंत आरोपी फरार झाला होता.

त्या व्यक्तीचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. तो व्यक्ती यापूर्वीच तुरुंगात गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गरीब कुटुंबातील मुलींना फसवण्याचे काम करतो. पोलिसांनी आरोपीचे अल्टो वाहन जप्त केले असून त्यात पोलिसांचा गणवेश आढळून आला आहे. अस्लम असे आरोपीचे नाव आहे.

एक मध्यमवयीन व्यक्ती आपला धर्म लपवण्याच्या बहाण्याने एका मुलीशी लग्न करत होता. चास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात तो यापूर्वीही तुरुंगात गेला आहे. मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी

ओळख कशी झाली?

चौकशीत आरोपीने मुलीच्या आईला एका बँकेत भेटल्याचे समोर आले. त्याने सांगितले की त्याचे नाव संजय बेसरा आहे आणि तो बँक मॅनेजर आहे. त्याने महिलेला सांगितले की आपण तिचे कर्ज माफ करून देतो. दरम्यान, कर्जही पास झाले. यानंतर आरोपीने महिलेला फोन करून तिच्या घरी भेटायला सुरुवात केली.

तो पोलिसांच्या गणवेशात घरी यायचा आणि दुसऱ्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी म्हणून ओळख सांगायचा. गरिबीमुळे मुलीचे लग्न आरोपीसोबत लावण्यास कुटुंबीय राजी झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस