शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 20:52 IST

मुलीच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळ करून हुंड्याचा तगादा लावल्याने आत्महत्या केली

ठळक मुद्देमुंबईच्या सांताक्रूझ येथील वाकोला येथे राहणाऱ्या राजबहादूर रामजतीन सिंह (65) यांची मुलगी रेश्मा (29) हीचा नालासोपारा मधील सुशील सिंग याच्या सोबत लग्न झाले होते. रेश्मा हिने 17 मे ला ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था विभागातील श्रीपाल ट्रेझर इमारतीच्या रूम नंबर डी/303 मध्ये 17 मे ला संध्याकाळी नवविवाहिता शिक्षेकेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळ करून हुंड्याचा तगादा लावल्याने आत्महत्या केली म्हणून शनिवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पती व तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.मुंबईच्या सांताक्रूझ येथील वाकोला येथे राहणाऱ्या राजबहादूर रामजतीन सिंह (65) यांची मुलगी रेश्मा (29) हीचा नालासोपारा मधील सुशील सिंग याच्या सोबत लग्न झाले होते. 3 फेब्रुवारी 2018 ते 17 मे 2019 यादरम्यान नवऱ्याने व तिच्या सासरच्या मंडळींनी वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करू लागल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे रेश्मा हिने 17 मे ला ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरा सुशील जितेंद्र बहादूर सिंग, सासू उर्मिला जितेंद्र सिंग, सासरे जितेंद्र बहादूर सिंग, दिर आतिषकुमार आणि नणंद सोनू सिंग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसdowryहुंडा