हनीमूनला गेल्यावर पत्नीला समजलं पती नपुंसक आहे आणि मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:54 PM2022-05-26T13:54:58+5:302022-05-26T13:55:13+5:30

Madhya Pradesh Crime News : जेव्हा तिने याबाबत आपल्या पतीसोबत आणि सासरच्या लोकांसोबत चर्चा केली तेव्हा तिला मारहाण केली गेली आणि हुंडाही मागण्यात आला.

Newly married wife find out husband is impotent on honeymoon dowry case Indore | हनीमूनला गेल्यावर पत्नीला समजलं पती नपुंसक आहे आणि मग झालं असं काही...

हनीमूनला गेल्यावर पत्नीला समजलं पती नपुंसक आहे आणि मग झालं असं काही...

Next

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये एका नवविवाहितेने आपल्या पतीसहीत सासरच्या काही लोकांविरोधात हुंड्यांसाठी अत्याचार केल्याची केस दाखल केली आहे. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीला अनेक गंभीर आजार आहेत. ज्या लग्नाआधी सांगण्यात आल्या नव्हत्या. महिला म्हणाली की, तिचा पती नपुंसक आहे हे तिला त्यांच्या हनीमूनला समजलं. पीडितेने आरोप केला की, जेव्हा तिने याबाबत आपल्या पतीसोबत आणि सासरच्या लोकांसोबत चर्चा केली तेव्हा तिला मारहाण केली गेली आणि हुंडाही मागण्यात आला.

याप्रकरणी पोलीस अधिकारी ममता त्रिपाठी यांनी सांगितलं की, इंदुरच्या नेहरू नगरची राहणारी पीडित महिलेने आरोप केला की, तिचं लग्न फेब्रुवारी २०२२ मध्ये कुटुंबियांच्या सहमतीने झालं होतं. मुलीकडील लोकांनी हुंड्यासहीत ५ लाख रूपये मुलाकडील लोकांना दिले होते. 

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर ती मुंबईला सासरी पोहोचली. एक आठवडा ती तिथे राहिली. त्यादरम्यान पतीने तिच्यासोबत संबंध ठेवले नाही. त्यानंतर ते हनीमूनला गेले तेव्हा समजलं की, पती नपुंसक आहे. पीडितेने जेव्हा हे सासरी सांगितलं तर तिला मारहाण केली गेली. त्यासोबतच १० लाख रूपयांची मागणी केली गेली. सोबतच पीडितेला घरातून काढण्यात आलं.

ममता त्रिपाठी यांनी सांगितलं की, नवविवाहिता मुंबईची राहणारी आहे आणि इंदुरमध्ये तिचं सासर आहे. पीडितेने महिला पोलीस स्टेशनमध्ये पती, नणंद आणि तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

Web Title: Newly married wife find out husband is impotent on honeymoon dowry case Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.