शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा! खंडणी नाही तर सिद्धू मुसेवालाने केलं नव्हतं लॉरेन्स बिश्नोईचं 'हे' काम, म्हणून गेला त्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:34 IST

Sidhu Moose Wala Murder : अनेकदा लॉरेन्सच्या गुडांनी सिद्धू मूसेवाला याला धमकीही दिली होती. त्यामुळेच सिद्धू मूसेवाला दविंदर बंबीहा गॅंगच्या संपर्कात आला होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोलही चौकशीच्या जाळ्यात असेल.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala Murder) हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) केल्या जात असलेल्या स्पेशल सेलमधील चौकशीतून रोज नवीन खुलासे होत आहेत. स्पेशल सेलच्या चौकशीतून समोर आलं की, लॉरेन्स बिश्नोईला सिद्धू मूसेवालावर दबाव बनवायचा होता. लॉरेन्स आणि गोल्डी बरारची इच्छा होती की, मूसेवालाने त्यांच्यासाठी गाणं गायला हवं.

अनेकदा लॉरेन्सच्या गुडांनी सिद्धू मूसेवाला याला धमकीही दिली होती. त्यामुळेच सिद्धू मूसेवाला दविंदर बंबीहा गॅंगच्या संपर्कात आला होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोलही चौकशीच्या जाळ्यात असेल. पण तो सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे.

चौकशी करणाऱ्या एजन्सीकडे लॉरेन्स बिश्नोई कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इनपूट आहे. त्यामुळे रिमांड आणि चौकशी दरम्यान त्याला मोठ्या सुरक्षेत ठेवलं जात आहे. एजन्सीला माहिती मिळाली की, जर त्याला जामीन मिळाला तर तो परदेशात पळून जाऊ शकतो.

असंही दिसलं आहे की,  लॉरेन्स बिश्नोई आजपर्यंत कोणत्याही हत्येमध्ये थेटपणे सहभागी नव्हता. तो केवळ त्याच्या नेटवर्कचा वापर करून खंडणी आणि हत्येचं प्लानिंग व षडयंत्र करणे यात सहभागी राहतो. एका गॅंगचं काम दुसऱ्या गॅंगकडून करून घेतो आणि दुसऱ्याचं काम तिसऱ्या गॅंगकडून.

तिहार तुरूंगात बसून लॉरेन्स बिश्नोई त्याची गॅंग अशी काही चालवतो, जशी तो बाहेर येऊनही चालवू शकला नसता. सूत्रांनुसार, या गॅंगमध्ये साधारण 700 शूटर्स आहेत, जे लॉरेन्सच्या एका इशाऱ्यावर कोणतंही काम करायला तयार होतात.

हे सगळे शूटर्स दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पसरले आहेत. या गॅंगचा हवालातील पैसा ब्रिटन आणि दुबईमध्येही अनेक ठिकाणी लावला आहे. ज्याची माहिती एजन्सीला मिळाली आहे.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी