शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 21:08 IST

आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई -  राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने नवा खुलासा केला आहे. या गोळीबारातील ३ आरोपी गुरमैल सिंह, धर्मेंद्र कश्यप आणि शिवकुमार हे लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सातत्याने संपर्कात होते. ते स्नॅपचॅटच्या माध्यमातून संवाद साधायचे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. या कटात सहभागी असणाऱ्यांकडून ४ फोन जप्त केलेत. या फोनच्या पडताळणीत हत्येच्या आधी आरोपी अनमोलच्या संपर्कात असल्याचं पुढे आले आहे.

क्राइम ब्रांचच्या सूत्रांनुसार, ज्या ३ हल्लेखोरांनी गोळीबार केला ते तिघेही वेगवेगळ्या वेळी अनमोल बिश्नोईशी स्नॅपचॅटवर बोलत होते. हा पहिलाच पुरावा पोलिसांसमोर आलाय, ज्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा थेट लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलशी कनेक्शन होते. याच वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सीवर करण्यात आलेल्या गोळीबारात अनमोल बिश्नोई फरार होता. आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे.

गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, तीन शूटर्सशिवाय पुण्यातून अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर हा अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईला पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी गोळीबार प्रकरण आणि आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई शूटरच्या संपर्कात असल्याच्या पुराव्यानंतर एनआयएने ही पावले उचलली आहेत. एनआयए आधीच अनमोल बिश्नोईचा शोध घेत आहे. सिद्धू मूसवाला खून प्रकरणानंतर तो फरार झाला होता.  

अनमोलला केनियात पाहिल्याची खबर लागली होती. त्यानंतर २ वर्षांनी एप्रिल २०२३ साली अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात बेकर्सफिल्डमध्ये अनमोल बिश्नोई एका कार्यक्रमात दिसला होता. पंजाबी गायक औजला आणि शेरीमान यांच्या कार्यक्रमात अनमोल स्टेजवर सेल्फी घेताना सोशल मीडियात फोटो समोर आला. अनमोलच्या सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमध्ये आयपी एड्रेस तपासला असता तो पोर्तुगालचा समोर आला. तो अमेरिकेत कुठेतरी लपल्याची माहिती असून नेहमी कॅनडाला जात असल्याचेही समजलं आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारी