शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, शेजाऱ्याने कात्रीने कापला तिचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:53 IST

Delhi Crime News : गांधीनगर भागात 1 जुलैला दुपारी  12 वाजून 38 मिनिटांनी पोलिसांना सूचना मिळाली की, एका घकात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.

Delhi Crime News : दिल्लीच्या गांधीनगर भागातील 22 वर्षीय महिलेच्या हत्येचा खुलासा  पोलिसांना केला आहे. पोलिसांनी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका तरूणाला अटक केली आहे. पोलिसांनुसार, शारीरिक संबंध ठेवण्यावरून आरोपीने महिलेचा कात्रीने गळा कापून हत्या केली. पोलीस अधिकारी आर. सत्यसुंदरम यांनी सांगितलं की, आरोपी 25 वर्षीय मान सिंह हा आहे. तो यूपीतील कौशांबी येथे राहणारा आहे.

गांधीनगर भागात 1 जुलैला दुपारी  12 वाजून 38 मिनिटांनी पोलिसांना सूचना मिळाली की, एका घकात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. महिलेचा गळा कापलेला आहे. ही महिला तिचा पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. महिलेच्या पोस्टमार्टममधून समजलं की, तिची हत्या गळा कापल्याने झाली आहे.

पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सीसीटीव्ही फु़टेज चेक केले. पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली. चौकशी दरम्यान 10 तासांचे सीसीटीव्ह फुटेज चेक करण्यात आले. आजूबाजूच्या शेकडो लोकांमधून आरोपीची ओळख पटवणं अवघड होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही भाडेकरूंच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.

तीन दिवसांच्या मेहनतीनंतर आरोपीची ओळख पटली आणि तो महिलेच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका छोट्या रूममध्ये राहतो. तो शेजारच्या कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. चौकशी केल्यानंतर आरोपी मान सिंहने त्याचा गुन्हा कबूल केला.

एक जुलै रोजी तो फॅक्टरीमध्ये गेला नव्हता. रात्री साडे नऊ वाजता तो घरातून निघाला आणि शेजारच्या दुकानातून कात्री घेऊन आला. रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी पीडिता छतावर कपडे वाळत टाकायला गेली होती. जेव्हा ती परत येत होती तेव्हा त्याने तिचा रस्ता अडवला. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेने त्याला रागावलं आणि म्हणाली की, ती हे तिच्या पतीला सांगणार.

यावरून मान सिंह भडकला आणि त्याने महिलेवर कात्रीने हल्ला केला. जेव्हा महिला पायऱ्यांवर पडली तेव्हा त्याने तिचा गळा कापला. यानंतर तो रूममध्ये परत गेला. पाण्याने कात्री आणि हात धुतले. पुरावे मिटवण्यासाठी त्याने त्याचे कपडेही धुतले. 

आरोपी मान सिंह कौशांबी यूपीतील राहणारा आहे. तो अविवाहित आहे आणि तीन वर्षाआधी कामासाठी दिल्लीला आला होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं 13-14 वयापासून तो दारू पिऊ लागला होता. तो गेल्या तीन वर्षांपासून त्याच घरात राहत होता. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी