शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! चिकनला चव नाही म्हटलं म्हणून भाच्याने केली मामाची हत्या, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 10:52 IST

ही घटना लंदनपुरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री भाचा मंगलदीपने त्याच गावात राहणाऱ आपला मामा छोटेलाल याला चिकन आणि दारूच्या पार्टीला आपल्या घरी बोलवलं होतं.

उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) लखीमुपूर खीरीमध्ये हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका भाच्याने मामाची हत्या केली. कारण भाच्याच्या घरात तयार केलेलं चिकन टेस्टी नसल्याचं म्हणाला. आधी यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर दोघांनी एकमेकांना मारहाण सुरू केली आणि मग भाच्याने मामाची हत्या (Nefhew killed Uncle) केली.

ही घटना लंदनपुरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री भाचा मंगलदीपने त्याच गावात राहणाऱ आपला मामा छोटेलाल याला चिकन आणि दारूच्या पार्टीला आपल्या घरी बोलवलं होतं. आधी दोघांनी दारू ढोसली आणि नंतर चिकनवर ताव मारू लागले. (हे पण वाचा : पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!)

या दरम्यान मामाने भाच्याला विचारलं की, चिकन तू बनवलं का? अजिबात टेस्टी नाही. यावरून मामा-भाच्यात वाद पेटला. वाद सुरू असतानाच मामा छोटेलालने भाच्याला एक छापड मारली. यामुळे संतापलेला भाचा मंगलदीपने घरात शेताच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राने  मामावर जोरदार वार केला. 

हल्ल्यानंतर काही लोक कसेबसे मामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र, जास्त रक्त वाहून गेल्याने मामा छोटेलालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. याची माहिती जेव्हा गावात मिळाली तर एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नंतर भाचा मंगलदीप याला अटक केली. (हे पण वाचा : खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला)

पोलीस अधिक्षक विजय ढुल म्हणाले की, दोन्ही मामा-भाचे सारख्या वयाचे होते. दोघेही मित्रासारखे वागत होते. ज्यामुळे भाचा मंगलदीपने मामा छोटेलाल याला पार्टीसाठी घरी बोलवलं. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. भाच्याने रागाच्या भरात आणि नशेत असताना मामावर हल्ला केला. मामा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

छोटेलालचा नातेवाईक बाबू याने सांगितलं की, जेवणाआधी दोघे दारू प्यायले. नंतर जेवणाता चिकनवरून काहीतरी वाद झाला. ज्यानंतर भाच्याने मामाची हत्या केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी