शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर फटाके वाजवू नका, सांगितल्याने शेजाऱ्यांनी एका कुटुंबाला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 14:38 IST

Crime News : घरातील लहान मुलगा व आजीला त्रस होत आहे असे सांगितले. या कारणावरुन शेजाऱ्यांनी या तरुणासह त्याच्या आई व आजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देमराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी भूषण पवार व दिनेश सावंत यांनी आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण - दिवाळीत कोरोनामुळे फटाके वाजवू नका असे सरकारतर्फे आवाहन करण्यात आलेले असता कल्याण शिवाजीनगर परिसरात काही मंडळी जोरात फटाके वाजवित होती. एका तरुणाने घरासमोर जोरात फटाके वाजू नका. घरातील लहान मुलगा व आजीला त्रस होत आहे असे सांगितले. या कारणावरुन शेजाऱ्यांनी या तरुणासह त्याच्या आई व आजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

शिवाजीनगर येथे राहणारा अभिजीत वाघमारे हा तरुण दिवाळीच्या दिवशी घरी होती. त्याच्या घरात दिवाळीचा आनंद साजरा केला जात होता. भाऊबीजेच्या दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याच्या घराशेजारी राहणा:या तरुणांनी त्याच्या घराजवळ मोठया आवाजाचे फटाके वाजविणो सुरु केले. त्या फटाक्यांच्या ठिणग्या खिडकीतून घरात येत होत्या. फटाक्याच्या आवाजाचा त्रस त्याचा लहान मुलगा व आजीला होत होता. त्याने फटाके वाजवू नका असे शेजारी तरुणांना सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन शेजारी तरुणांनी अभिजीतला माराहाण केली. त्याच्या डाव्या डोळ्य़ाच्या खाली जबर दुखापत झाली आहे. अभिजीतला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई उषा सोडविण्यास गेली असता. तिच्या अंगावरील कपडे ओढून तिलाही मारहाण केली. नातू व मुलगीला मारहाण होत असल्या पाहून आजीबाई पुढे सरसावल्या. तेव्हा त्याच्या आजीलाही जोराचा ठोसा लगाविला गेला. आईच्या नाकातून रक्ताची धार लागली. अभिजीच्या आई उषा या उल्हासनगर महापालिकेतील कर्मचारी आहेत.

वाघमारे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अभिजीतला झालेल्या मारहाण प्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्र येताच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी भूषण पवार व दिनेश सावंत यांनी आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसDiwaliदिवाळीfire crackerफटाके