शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर: हुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी; ९ लाखाचा ऐवज लंपास, घरची मंडळी निद्रिस्त असताना चोरटे घरात सक्रिय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 22:46 IST

घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. हुडकेश्वर खुर्द परिसरात शितला माता मंदिराजवळ कृपाशंकर मितलाल शाहू (वय ३६) राहतात. एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कृपाशंकर यांचे तीन भाऊ त्यांच्या परिवारासह राहतात. ते पशू आहार आणि किराणा व्यावसायिक आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि आपआपल्या खोल्यांमध्ये झोपी गेले. मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास कुटुंबातील महिला जाग्या झाल्या. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनकक्षात कपाटात ठेवलेली चार लाखाची रोकड तसेच सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ९ लाख, १०  हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचे वृत्त परिसरात कळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी ठसे तज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर