शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

Aryan Khan Drug Case, NDPS Act: एनसीबीच्या ब्रम्हास्त्राची शक्तीच हिरावणार? NDPS कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 14:25 IST

NDPS act after Aryan khan, Sameer Wankhede: आधीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची ओरड होत असताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंवर 25 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री त्यांच्यामागे हात धुवून लागले आहेत.

आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आधीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची ओरड होत असताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंवर 25 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री त्यांच्यामागे हात धुवून लागले आहेत. ते कसे फ्रॉड आहेत, हे दर दिवसाला उघड करत आहेत. अशावेळी एनसीबीच आता रडारवर आली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर आता एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

Sameer Wankhede Case: NCB चे 'दिल्लीश्वर' येण्याआधीच मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमध्ये; समीर वानखेडेंविरोधात चौकशी सुरु

नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्स्टन्स म्हणजे NDPS कायद्यालाच आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दाखल झालेल्या याचिकेत या काद्यातील काही तरतुदींना आव्हान देण्यात आले आहे. ड्रग ट्रॅफिकर्स, पेडलर्स आणि कंझ्यूमर यांच्यामध्ये कायद्याच्या दृष्टीने फरक असायला हवा. या कायद्यातील जो ड्रग्ज सेवन करतो त्याला शिक्षा करण्याची तरतूद रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने कमी काळासाठी ड्रग घेणाऱ्यांवर कारवाई करू नये, असा सल्ला दिला आहे. 

Sameer Wankhede यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध, क्रूझवरील पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाही होता

ही याचिका वकील जयकृष्ण सिंह यांनी दाखल केली आहे. त्यांनी एनडीपीएस कायद्यातील कलम 27ए, 35, 37 आणि 54 ला आव्हान दिले आहे. ड्रगची तस्करी आणि पुरवठा करणाऱ्यांना शिक्षा जरूर व्हावी, परंतू सहानुभूती दाखवत जे या ड्रग्जच्या विळख्याला बळी पडतात त्यांचा गुन्हेगारी कक्षेतून बाहेर काढावे. 

होय, मी करून दिला होता समीर-शबानाचा निकाह! काझींनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांना ड्रग्ज पीडितचा दर्जा देऊन त्यांना पुनर्वसन केंद्रांमध्ये पाठविण्याची तरतूद करावी असे सिंह यांनी म्हटले आहे. जगभरात ड्रग्जचे सेवन करणाऱ्या लोकांना गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर आपल्याकडे हा गुन्हा आहे. ही मोठी विसंगती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांच्या मनावरील घाव भरण्याची ही न्यायालयाकडे चांगली संधी आहे. ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्याऐवजी एजन्सी या कायद्याचा गैरवापर करत आहेत. आर्यन खान, रिया चक्रवर्तीमुळे हे अधोरेखित झाले आहे, चिंता वाढली आहे. व्यक्तीगत वापरासाठी काही ग्रॅम ड्रग घेत असेल तर त्याला तस्कर म्हटले जात आहे. गांजाचा वापर गुन्हेगारी श्रेणीतून बाहेर काढवा, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडे