शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik: कालीचरण प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना धमकी; राष्ट्रवादीने केली कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 11:21 IST

नवाब मलिक धमकी प्रकरणाकडे गांभिर्याने पाहावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

मुंबई: रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या अतिशय आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली. देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कालीचरण महाराजावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता या प्रकरणी नवाब मलिक यांना धमकी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नवाब मलिक यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एका युझरने केलेले ट्विट शेअर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना धमकी असल्याचे थेट दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सतेज पाटील आणि ट्विटर इंडिया यांना टॅग करून या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

काय म्हटले आहे त्या ट्विटमध्ये?

क्लाइड क्रास्टो यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये, हिंदुंना शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे ज्ञान असते. आणि कशाचा उपयोग कधी आणि कुठे करावा, हे ती ती वेळ ठरवत असते. बाकी कबाडी वाले आणि पंक्चर वाले यांना हे समजणार नाही, असे म्हटले आहे. या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला असून, नवाब मलिक यांना ही धमकी असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

काय म्हणाले होते नवाब मलिक?

अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे.  संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले... बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा... महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. 

दरम्यान, धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. रायपूर पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास १३ जानेवारीपर्यंत न्यायायलयीन कोठडीत पाठवले आहे. होते. तत्पूर्वी न्यायालयाने कालीचरणला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrime Newsगुन्हेगारी