शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक

By पूनम अपराज | Updated: September 28, 2020 16:06 IST

या बैठकीनंतर कारवाईचा फास आवळणार की मोठी कारवाई होणार याकडे  लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देएनसीबीने तिघींना समन्स बजाविल्यानंतर तिघींनी शनिवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी NCB प्रमुखांनी मुंबई गाठली आणि मुंबई, दिल्ली झोन तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनीबॉलीवूडवर केलेल्या कडक कारवाई दरम्यान मुंबई गाठली आहे. रविवारी अस्थाना मुंबईत पोहोचले असून त्यांनी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतली. विशेष गोष्ट म्हणजे राकेश अस्थाना यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. वकील विकास सिंह यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, एनसीबीचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून तपास भरकटत आहे. सीबीआय या प्रकरणावर शांत बसली आहे. जगभरात करोडो चाहते असलेल्या  बॉलिवूडसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरला. आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा  खान आणि श्रद्धा कपूर यांची ड्रग्ज सेवनाबद्दल जवळपास साडे पाच तास स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात आली होती. तिघीनीं ड्रग्जबाबत अप्रत्यक्ष संपर्क आल्याची कबुली दिली असली त्याचे सेवनाचा ठामपणे इन्कार केला होता. दरम्यान एनसीबीने तिघींचेही मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळत आहे. तिघींनी अनेक प्रश्नांवर असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना क्लिनचिट देण्यात आलेली नाही.मात्र त्यांना तूर्तास तातडीने पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दीपिकाने तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशसमवेतचा  ड्रगचॅट मान्य केला मात्र आपण पार्टीत ड्रग घेतले नसल्याचे सांगितले. तर सारा व श्रद्धा यांनी अनुक्रमे केदारनाथ व छीच्छोरे चित्रपटाच्या  चित्रीकरणावेळी सुशांत ड्रग्ज घेत होता, आपण मात्र त्यापासून अलिप्त होतो अशी कबुली दिली. श्रद्धाने सीबीडी ऑइल सेवनासाठी नाही तर अंग दुखत असल्याने मागविले होते, असा जबाब दिला असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले होते.   ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जया साहा हिने दिलेल्या माहितीतून आघाडीच्या अभिनेत्रीची नावे पुढे आल्याने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीने तिघींना समन्स बजाविल्यानंतर तिघींनी शनिवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी NCB प्रमुखांनी मुंबई गाठली आणि मुंबई, दिल्ली झोन तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कारवाईचा फास आवळणार की मोठी कारवाई होणार याकडे  लक्ष लागले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थDeepika Padukoneदीपिका पादुकोणSara Ali Khanसारा अली खानShraddha Kapoorश्रद्धा कपूर