शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा डाव ठरला निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:51 IST

दोन स्फोटातून थोडक्यात बचावले पोलीस पथक

घोटा (गडचिरोली) - नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसºया दिवशी सोमवारी (दि.३०) पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर नक्षलींनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही. घातपात घडविण्याचा नक्षलींचा डाव निष्फळ ठरल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील रेगडी उपपोलीस ठाण्यांतर्गत येणाºया रेगडी-कसनसूर मार्गावर रात्री नक्षलवाद्यांनी कुकरच्या सहाय्याने बनविलेला एक प्रेशर बॉम्ब (आयईडी) आणि लोखंडी पाईपमध्ये छर्रे भरून तयार केलेला एक क्लेमोर बॉम्ब जमिनीत पेरून ठेवला होता. पोलीस ठाण्यापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर विकासपल्ली फाट्याजवळ नक्षल्यांनी आपले बॅनर लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने ते बॅनर काढण्यासाठी पोलीस पथक गेले होते. तेथून ठाण्याकडे येत असतानाच पोलीस पथकापासून १०० फूट अंतरावर दोन्ही बॉम्बचा एकामागोमाग एक स्फोट झाला. याचवेळी एक युवक रस्त्याच्या कडेने झुडूपात लपत पळून जाताना आढळला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जंगलात दिसेनासा झाला.दोन्ही बॉम्बमध्ये जवळपास २० फूटांचे अंतर होते. पोलीस पथकाला स्फोटात पकडून जीवित हाणी करण्याचा नक्षलींचा डाव होता, मात्र तो यशस्वी झाला नाही.

- तर झाली असती जीवित हाणीया दोन बॉम्बपैकी प्रेशर बॉम्बच्या स्फोटामुळे साडेतीन फूट रूंद आणि ३ फूट खोल खड्डा पडला आहे. पोलीस पथक त्या ठिकाणाच्या जवळ असते तर मोठी जीवित हाणी झाली असती. या स्फोटानंतर त्या परिसरात आणखी बॉम्ब पेरले आहेत का याची तपासणी करण्यात आली. २८ जुलैपासून सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे आतापर्यंत सदर स्फोट वगळता कोणतीही हिंसक घटना घडवून आणण्यात नक्षलवाद्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी