शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भूसुरुंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 14:39 IST

चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार; दोघींवर मिळून १६ लाखांचे बक्षीस; चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी घडविला भूसुरूंग स्फोट

ठळक मुद्देपोलीस-नक्षल चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या भूसुरुंग स्फोटात पोलीस जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडूरवाही व पुलनार या दोन गावांच्या मध्ये असलेल्या जंगलात पोलिसांचे सी-६० पथक व नक्षलवादी यांच्यात शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. त्यापैकी एक डिव्हीजनल कमिटी सदस्य आहे. या चकमकीपूर्वी नक्षल्यांनी स्फोट घडविला, पण पोलिसांचे कोणतेही नुकसान झाले नाही.रामको नरोटी व शिल्पा दुर्वा अशी ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. रामको ही नक्षली नेता भास्कर याची पत्नी आहे. ती डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून नक्षल चळवळीत कार्यरत होती. तिच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शिल्पा ही दलम सदस्य होती. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिसांनी सांगितले.सी-६० जवानांकडून नक्षल शोधमोहीम राबविली जात असताना गुंडूरवाही व पुलनार या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सी-६० पथकावर गोळीबार केला. प्रत्त्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता, दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. घटनेची माहिती मिळताच जवानांना मदत करण्यासाठी गडचिरोलीवरून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच दोन नक्षली दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

लाकडी बीटला लावली आगदरम्यान एटापल्लीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पंदेवाही ते ताटीगुडम गावादरम्यान वनविभागाच्या लाकडाच्या बीटला नक्षलवाद्यांनी शनिवारी पहाटे आग लावली. यामध्ये जवळपास १५ लाकडी बिट जळून खाक झाले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीforestजंगलPoliceपोलिस