शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

जहाल नक्षली दाम्पत्याला अटक, दोघांवर होते १८ लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 21:18 IST

३६ वाहनांच्या जाळपोळीचा सूत्रधार

ठळक मुद्दे जहाल नक्षलवादी दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा यांना पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.४) अटक केली. ती दिनकरची दुसरी पत्नी म्हणून वावरत असून पहिल्या पत्नीने यापूर्वीच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.दिनकर हा उत्तर गडचिरोली आणि कोरची दलमच्या विभागीय समितीचा सदस्य आहे.

गडचिरोली - गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ करून भीषण भूसुरूंग स्फोट घडविला होता, त्या घटनेतील तीन सूत्रधारांपैकी एक असलेला जहाल नक्षलवादी दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा यांना पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.४) अटक केली. दिनकर हा उत्तर गडचिरोली आणि कोरची दलमच्या विभागीय समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १६ लाख तर कोरची दलमची सदस्य असलेली त्याची पत्नी सुनंदा हिच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पो.अधीक्षक मनिष कलवानिया, गडचिरोलीचे एसडीपीओ सूदर्शन आणि कुरखेडाचे एसडीपीओ तथा तपास अधिकारी जयदत्त भवर उपस्थित होते.

१ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे पहाटे नक्षलवाद्यांनी ३६ वाहने जाळल्यानंतर त्याच मार्गावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान आणि एका खासगी वाहनचालकाला जीव गमवावा लागला होता. भूसुरूंगाच्या घटनेचा तपास नंतर राष्टीय तपास संस्थेने हाती घेतला तर वाहनांच्या जाळपोळीचा तपास जिल्हा पोलीस दलाकडेच आहे. दोन्ही घटनेतील बहुतांश आरोपी सारखेच असले तरी जाळपोळीच्या घटनेसंदर्भातील ही पहिलीच अटक आहे. जवळपास ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून पोलीस दिनकरच्या मागावर होते, अशी माहिती पो.अधीक्षक बलकवडे यांनी दिली.या गुन्ह्यांत होता सहभाग२००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सहभागी झालेला दिनकर गोटा नंतर बढती होत चातगाव दलम सदस्य, टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, धानोरा दलम कमांडर, टिपागड दलम एरिया कमिटी सचिव, कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या विभागीय समितीच्या सदस्य पदावर जाऊन पोहोचला होता. जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याची पकड होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात ३३ खुनांचा समावेश आहे. नक्षली सुनंदा कोरेटी हिच्यावर ३८ गंभीर गुन्हे आहेत. ती दिनकरची दुसरी पत्नी म्हणून वावरत असून पहिल्या पत्नीने यापूर्वीच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.खोब्रामेंढा जंगलात चकमकदरम्यान बुधवारी सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढाच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. मोठ्या संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांचे तिथे शिबिर सुरू होते. पोलिसांची संख्या कमी असली तरी त्यांनी काही वेळ नक्षलवाद्यांना तोंड दिले. पण नक्षलवाद्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना अजून पुढे जाणे शक्य झाले नाही. काही नक्षली साहित्य मात्र पोलिसांच्या हाती लागले. संध्याकाळपर्यंत पोलीस पथक जंगलातून परत आलेले नव्हते, मात्र कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसArrestअटक