शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:14 IST

ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. 

मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले. ईडीने १४ दिवसांची नवाबांची कोठडी पाहिजे म्हणून युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. 

नवाब मलिकांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली होती. तसेच नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मलाच घरी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी एनआयएने दाऊदविरोधात गुन्हा दाखल केला असे ईडीने ऍडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. मनी लाँडरिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुह्यांत दाऊदचा सहभाग असून दाऊद इब्राहिम हा जैश ए मोहम्मदसोबत काम कारतो. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचे निधन झाले आहे, ती या सर्व कामांवर नियंत्रण ठेवत असे. अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांनी निधी उभारला आहे. कुर्ल्यातील गोवाले कंपाऊंडमधील मालमत्ताही हसीनाने जप्त केली आहे. मुनिरा आणि मरियम या दोघी या मालमत्तेच्या खऱ्या मालक आहेत. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती, ती दोघांच्या मालकीची होती, त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. गोवा कंपाऊंड ही तीच जमीन आहे, ज्यावर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला होता. 

नवाब मलिक काही डी-गँगचे सदस्य नाहीत, वकिलांचा कोर्टात दावा

२०२२ मध्ये पिडीतेने जवाब देणे आणि त्यात मला २० वर्षे पूर्वी काय घडले माहित नाही असे  सांगणे सोयीचे आहे.  १५ वर्षे तुम्हाला भाडे मिळाले नाही, पण पिडीताने त्या बाबतीत काहीही केल्याचे दिसत नाही.  तसेच मलिक यांच्या विरोधात कारवाई का?  ते काय डी गँगचे सदस्य नाहीत, असा युक्तीवाद मलिकांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. 

मलिकांचा संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही, वकिलांचा दावा

मुनिराला सलीम पटेल विरुद्ध तक्रार असेल तर या सगळ्यात मालिकांचा संबंध काय आहे? कारण मलिक स्वतःच याप्रकरणात बळी ठरले आहेत. कारण ज्या व्यक्तीकडे मालमत्तेचे अधिकार नव्हते त्यांनी मालिक यांना मालमत्ता विकली, असं मलिक यांचे वकील देसाई यांनी कोर्टात दावा केला आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय