शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

Nawab Malik Vs Sameer Wankhede: 'समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचे कॉल डिटेल्स मागितले', नवाब मलिकांनी केला फोन टॅपिंगचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:34 IST

Nawab Malik Vs Sameer Wankhede: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Nawab Malik Vs Sameer Wankhede: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून फोन टॅप केले जात असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच वानखेडे यांनी माझी मुलगी नीलोफर हिचेही कॉल डिटेल्स मागितले होते, पण मुंबई पोलिसांनी त्यास नकार दिला होता, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे मुंबई आणि ठाण्यात दोन लोकांच्या मदतीनं काही बड्या व्यक्तींचे फोन टॅप करत असल्याचाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे. 

एनसीबीनं जुलै महिन्यात नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. समीर वानखेडे यांनी माझाही फोन टॅप केला होता, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याशिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप करणं समीर वानखेडे यांच्याकडून सुरू आहे, असंही ते म्हणाले. समीर वानखेडे यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा जरूर ठोकून दाखवावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मी ठाम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू केलेली लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, असं मलिक यांनी सांगितला. मी जो दाखला ट्विट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावर नाव वेगळं एका बाजूला लिहिण्यात आलं आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत असं सर्टिफिकेट दिलं. त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. समीर यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते मुस्लिम म्ह्णून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र समोर आणावं, असं आव्हान मलिक यांनी दिलं.

मला वैयक्तिक बदनामी करायची नाही. परंतु समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मातर करून विवाह केला होता. समीर यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून 'आयआरएस' नोकरी घेतली. याबाबत आपण ठाम आहोत. त्यांनी आपल्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, न्यायालयात सर्व सत्य बाहेर येईल, असं मलिक म्हणाले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो