शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नवी मुंबई पोलिसांचाच ‘गेम’; सापळा तिघांवर, पणजी पोलिसांमुळे एकच लागला हाती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:55 IST

विकी देशमुख प्रकरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३३ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोक्कामधील गुन्हेगार विकी देशमुख याला ३० जुलैला पणजीमधून अटक केली आहे.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सराईत गुन्हेगार विकी देशमुख याच्यावर पणजी येथे लावलेल्या सापळ्यात मोक्कामधीलच इतर दोन गुन्हेगार निसटल्याची बाब समोर आली आहे. पणजी पोलिसांच्या मदतीने एका कॅसिनोबाहेर सापळा रचलेला असताना, नवी मुंबई पोलीस तिघे गुन्हेगार एकत्र येण्याची वाट बघत होते. त्यावेळीच पणजी पोलिसांनी विकीवर झडप टाकली. त्यामुळे इतर दोघांनी पोबारा केल्याने नवी मुंबई पोलिसांचा नियोजनबद्ध गेम फसला.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३३ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोक्कामधील गुन्हेगार विकी देशमुख याला ३० जुलैला पणजीमधून अटक केली आहे. गुन्हे शाखा पोलीस गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या शोधात होते. अखेर तो इतर काही साथीदारांसह गोव्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे देशमुख याच्यासह जितेंद्र देशमुख ऊर्फ बाळा व परशुराम मोकल यांना शिताफीने पकडण्याचा बेत नवी मुंबई पोलिसांनी आखला होता. यासाठी गुन्हे शाखा उपायुक्तांसह पथक पणजीला दाखल झाले होते. त्याद्वारे सापळा रचून ताब्यात घेतले. कारवाईवेळी त्याच्याकडे एक पिस्तूल मिळून आल्याने पणजीमध्ये गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात त्याचा ताबा पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे या गुन्ह्यात सुटल्यानंतर तो परत हातून निसटू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने गोव्यातील मुक्काम वाढवला होता. अखेर गुरुवारी नवी मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून शुक्रवारी रात्री त्याला नवी मुंबईत आणले. 

स्थानिक पोलिसांसोबत वाद? 

कारवाईसाठी स्थानिक पोलिसांची मदत हवी असल्याने पणजी पोलिसांना कळवण्यात आले होते. परंतु, एका अधिकाऱ्याकडून देशमुखबद्दलची गुप्तता राखण्याऐवजी त्याच्या गुन्हेगारीचा पाढा वाचण्यात आला.त्यामुळे गोवा पोलिसांनी बाजी पलटवून विकी देशमुख दिसताच त्याच्यावर झडप टाकली. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना हवे असलेले इतर दोघे सावध झाल्याने ते हाती लागलेच नाहीत. यावरून नवी मुंबई पोलीस व गोवा पोलीस यांच्यात वाददेखील झाल्याचे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :Policeपोलिस