शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:13 IST

गुन्हा दाखल झाल्यानंतरही अभय कुरुंदकरला अटक केली नाही.  अधिकाऱ्यांनी तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले.

वैभव गायकर

पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाने हत्याकांडातील तपास अधिकाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश नवी मुंबई पोलिस आयुक्तांना दिले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी तपास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून ते अधिकारी योग्य तपास करण्याऐवजी भारतभ्रमण करीत राहिल्याचे सांगून ‘बगल मे छोरा, गाव मे ढिंढोरा’ असा प्रकार करीत राहिल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.

नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपेरे, सुरवसे, तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे या अधिकाऱ्यांनी तपासात अक्षम्य केले. गुन्हा दाखल झाल्यानंतरही अभय कुरुंदकरला अटक केली नाही.  अधिकाऱ्यांनी तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले.

तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. तत्कालीन पोलिस आयुक्तांविरोधात तक्रारदार यांची पुन्हा तक्रार नोंदवून पुन्हा चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले. मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावली. मात्र,  काही सवलतीचा फायदा त्याला होणार आहे. त्याचा अभ्यास करून पुन्हा अपिलाबाबत निर्णय घेऊ. - प्रदीप घरत, विशेष सरकारी वकील

कधीच गुन्ह्याला वाचा फुटली असती पुन्हा एकदा न्यायमूर्ती पालदेवार यांनी कुरुंदकर यांची राष्ट्रपती पदकासाठी केलेल्या शिफारशीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासातील दुर्लक्षामुळे त्याचा फायदा आरोपीला झाला.  त्यामुळेच अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह सापडला नाही. जेव्हा बिद्रे बेपत्ता झाल्या, तेव्हा कुरुंदकर याचा या बेपत्ता होण्यामागे रोल दिसत होता. तेव्हा त्याची चौकशी केली असती तर या गुन्ह्याला कधीच वाचा फुटली असती, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी  त्यादिशेने तपास केला नसल्याने खटल्यावर परिणाम झाला.

त्याच्या मोबाइलच्या सीडीआरमधून सर्व घटनाक्रम बाहेर आले असते. मात्र, ती तसदी न घेता तपास अधिकारी वेळकाढूपणा करीत राहिल्याने तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले.