शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: तुर्भे येथून प्रतिबंधित गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 14, 2022 18:24 IST

२५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गुन्हे शाखा पोलिसांनी तुर्भे येथून २५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. टपरीवर गुटखा विकला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी टपरी चालकावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुर्भे सेक्टर २० येथे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी असलेल्या मनोज पान शॉप या टपरीवर गुटखा विकला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी टपरीमध्ये गोणीत ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सुमारे २५ हजार रुपये किमतीचा हा गुटखा टपरी चालकाने विक्रीसाठी साठवला होता. मात्र त्याला गुटखा पुरवणाऱ्याचे नाव अद्याप पोलिसांसमोर आलेले नाही. या प्रकरणी टपरी चालक मनोज चौहान विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्याकडून आढळलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस