शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलीस चौकीत 'झिंग झिंग झिंगाट'; मद्यपी पोलिसांकडून नागरिकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:47 IST

Police Drunk in Police Station: कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा 'बार' बनविल्याने  तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे.

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी.के.नगर पोलीस चौकीमध्ये मंगळवारी (दि.15) रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलिसांची ओली पार्टी रंगलेली आढळून आली. टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी जागरूक नागरिक गेला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी 55 ते 60वर्षीय नागरिकाला चौकीत घेऊन दरवाजा लावून घेत लाईट बंद करून बेदम मारहाण केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. 

गंगापूर रोड आकाशवाणी टॉवर, निर्मला कॉन्व्हेंट शाळेचा परिसर सुशिक्षित उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागातील डी.के नगर पोलीस चौकीत बाळासाहेब शिंदे हे उद्यानात बसलेल्या टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी चौकीत 5 ते 6पोलीस कर्मचारी ओली पार्टीत 'झिंगाट' झालेले होते. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावून घेतले आणि लाईट बंद करून मारहाण केली, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. हा प्रकार जेव्हा परिसरात समजला तेव्हा रहिवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली.  यावेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत चौकीतून पळ काढला. नागरिकांनी दुचाकीने पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले असता नंतर तो पोलीस चौकीत आला. 

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा 'बार' बनविल्याने  तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती नागरिकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात कळविली असता त्यांनतर घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आदी अधिकारी दाखल झाले. दरम्यान, शिंदे यांनी तक्रार देण्यासाठी गंगापूर पोलीस ठाणे गाठले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सुरेश जाधव, मयूर सिंग असे पार्टी करणाऱ्या संशयित पोलिसांची नावे आहेत.

मद्यपी पोलिसांपैकी एकाला रात्री पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते बाकीचे चार फरार झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. कायदा व शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय याप्रकरणी काय भूमिका घेतात आणि मद्यपी पोलिसांवर काय कारवाई चे आदेश देतात, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस