शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक अत्याचार प्रकरण: धर्मांतराचा डाव, पीडितेला उपवासासह विशिष्ट कपडेच घालण्याचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:49 IST

धर्मांतरासाठी ब्रेनवॉश, देवदेवतांचे फोटो डिलीट करण्याची बळजबरी

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: येथील मुंबई नाका परिसरातील बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या लैंगिक अत्याचार, तसेच धर्मांतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, धर्मांतराचा डाव पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी हिंदू तरुणींना विशिष्ट कपडे परिधान करण्यासाठी दबाव टाकतानाच एका पीडितेला महिनाभर उपवास करण्यासही भाग पाडल्याचे समोर आले आहे.

पहिल्या गुन्ह्यातील पीडितेने हिंदू तरुणींकडून आलेले जेवणाचे निमंत्रण टाळले होते. धर्मांतरासाठी तिचा ब्रेनवॉश केल्याने तसा पगडा तिच्यावर बसला होता. मोबाइलमधील देवदेवतांचे फोटोदेखील डिलीट करण्यास संशयित तरुण भाग पाडत असत. तिने लिपस्टिक लावणे सोडले होते. संशयितांनी कंपनीत अनेकवेळा प्रार्थना करत कट्टर धार्मिकता दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी सहा संशयितांना बेड्या ठोकल्या असून एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. 

महिला मॅनेजरला काेठडी

या प्रकरणातील संशयित आरोपी तथा कंपनीची ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानीला १३ एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे; तर अटकेतील पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शफी भिकन शेख, असिफ आफताब, शाहरूख कुरेशी, रझा मेमन, दानीश शेख आणि तौसीफ अत्तार यांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या होत्या. आश्विनी चैनानीला गुरुवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते.

आठपैकी दोघी विवाहित, एका तरुणाचे धर्मांतर?

  • याप्रकरणी आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आठपैकी दोन महिला विवाहित, तर सहा तरुणी अविवाहित आहेत.
  • नऊपैकी एका गुन्ह्यात लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न झाला असून, दुसऱ्या गुन्ह्यात एका तरुणाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. 
  • उर्वरित सहा गुन्ह्यांत पीडितांसोबत लैंगिक जवळीक साधून धार्मिक भावना दुखविण्यात आल्याचा आराेप तक्रारदारांनी केला आहे.

कंपनी कार्यालयावर भाजपची धडक

महिलांवरील विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, तसेच एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) भारतीय जनता युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Atrocity: Religious Conversion Attempt, Pressure for Fasting, Specific Clothing

Web Summary : Nashik's multinational company case reveals a planned conversion attempt. Victims were pressured to wear specific clothes and fast. A manager is arrested; multiple suspects face charges of sexual harassment, hurting religious sentiments, and forced conversion.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकMuslimमुस्लीमHinduहिंदूBJPभाजपा