शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर, टेम्पो चोरीच्या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांनी ४८ तासात लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 17:38 IST

Narpoli police cracked down Robbery : पाच आरोपींसह ८५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त 

ठळक मुद्देअज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने ७६ लाख रुपये किमतीचा माल व ५ लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता.

नितिन पंडीत

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रातील दापोडा व पुर्णा येथून माल भरलेले कंटेनर व टेम्पो चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावून या मधील पाच आरोपीं सह चोरीस गेलेला ८५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे .

         

पहिल्या घटनेत दापोडा येथील श्रीराम कंपाऊंड येथे गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॅनव्हस ,रिव्हाल्युशन ब्युटीया या कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौंदर्य प्रसाधने साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने ७६ लाख रुपये किमतीचा माल व ५ लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता.

   

  

तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा १ लाख १० हजार रुपये किमतीचा चॉकलेट व खाद्य सामुग्रीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा करून ठेवला असता रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असतानाच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस उप निरीक्षक राहुल व्हरकटे, पो हवा सोनवणे, सातपुते,नवले,जाधव,पाटील,सोनगिरे, बंडगर, माने,ताटे या पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील मोबाईल टॉवर वरून त्या परिसरात त्या वेळी कार्यरत मोबाईलचा तांत्रिक तपास करीत पहिल्या गुन्ह्यात राजकुमार रामचंद्र पाल ,शिवानंद अनिल पवार ,विनायक मोहन जगताप तिघे व्यवसायाने चालक असणाऱ्या आरोपींना अटक केली तर दुसऱ्या गुन्ह्यात इम्तियाज लियाकतअली अन्सारी उर्फ पंजाबी व आजीदूर रहेमान मोहम्मद हरून अन्सारी हे टेम्पो घेऊन मालेगाव येथे पळून गेल्याची माहिती काढून पोलिसांनी सापळा रचून या दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे .  या पाच ही आरोपीं कडून चोरीस गेलेले कंटेनर ,टेम्पो व सर्व ८५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे .

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक