शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करून हत्या करणारा नराधम जेरबंद 

By पूनम अपराज | Updated: February 8, 2019 15:56 IST

त्यानंतर माहीम पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमाने या गुन्ह्याची उकल केली आणि आरोपी मेहंदीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

ठळक मुद्दे नराधम मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) या आरोपीला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या गळ्यावर खुणा असल्याने तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला होता. अटक आरोपी शेख हा माहीम परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे. 

मुंबई - माहीम परिसरात फुटपाथवर झोपलेल्या  ५ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर हत्या करणारा नराधम मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) या आरोपीला माहीम पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. त्यानंतर माहीम पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमाने या गुन्ह्याची उकल केली आणि आरोपी मेहंदीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

काल सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षास माहीम परिसरात एक अनोळखी मृतदेह सापडल्याबाबत फोन प्राप्त झाला होता. नंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. या गंभीर घटनेनंतर पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके कामाला लागली. या परिसरातील दुकानाबाहेरील सीसीटीव्हीची झाडाझडती घेताना पोलिसांच्या हाती एक फुटेज लागले. यामध्ये एक इसम या मुलीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाताना दिसला. मात्र या फुटेजमध्ये तो पाठमोरा असल्याने चेहरा दिसत नसल्याचे पोलिसांनी कंबर कसून या परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, नशा करणारे तरुण यांची चौकशी केली. दरम्यान, मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेखला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.  माहीमच्या रझाक मंजिलजवळ फुटपाथवर ही मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या पालकांसोबत बुधवारी रात्री झोपली. पहाटे पाचच्या सुमारास अपंग वडिलांना जाग आली त्यावेळी मुलगी शेजारी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पत्नी आणि नातेवाईकांना सोबत घेऊन मुलीला शोधण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरात मुलगी कुठेच सापडली नाही. घाबरलेल्या आईवडिलांनी माहीम पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनीही पालकांसोबत या मुलीचा शोध सुरू केला. सकाळी साडेआठच्या सुमारास रझाक मंजिलपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या न्यू राजेंद्र अपार्टमेंटजवळील निर्मनुष्य ठिकाणी अर्धनग्न स्थितीमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला. या मुलीच्या गळ्यावर खुणा असल्याने तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला होता. अटक आरोपी शेख हा माहीम परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन आहे. 

 

टॅग्स :ArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदाSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसKidnappingअपहरण