शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नंदिनीचा बॉयफ्रेन्डसोबतचा व्हिडीओ पाहून संतापला होता अरविंद; फेसबूक पोस्ट पाहून रस्त्यातच संपवण्याचा रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:16 IST

ग्वालियरमधल्या नंदिनी हत्याकांडात पती अरविंदने धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

Gwalior Nandini Murder Case:मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये शुक्रवारी घडलेल्या नंदिनी परिहार हत्याकांडाच्या घटेनेने संपूर्ण मध्य प्रदेशला हादरून टाकले आहे. नंदिनीच्या हत्येनंतर फसवणूक आणि गुन्ह्यांची एक मोठी मालिका उघडकीस आली आहे. पती अरविंद परिहारने दिवसाढवळ्या नंदीनीची गोळी झाडून हत्या केली होती. अरविंद परिहारला त्याच्या कृत्याबद्दल अजिबात पश्चात्ताप नाही. चौकशीदरम्यान त्याने हसत मी रोजच्या भांडणातून मुक्त झालो असं म्हटलं. दुसरीकडे,  फेसबुकवर वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अरविंदने नंदिनीची हत्या केल्याचे म्हटलं जात आहे.

नंदिनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तिने ४ दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता. तो व्हिडीओ बॉयफ्रेंड अंकुश पाठकच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा होता. या व्हिडिओनंतर अरविंद संतापला होता. १२ सप्टेंबर रोजी जेव्हा नंदिनी तिच्या बॉयफ्रेंड अंकुशसोबत एसपी ऑफिसमधून त्याच्याबद्दल तक्रार करून परत येत होती, तेव्हा पती अरविंद परिहारने तिला रूपसिंग क्रिकेट स्टेडियमसमोर थांबवले आणि तिच्यावर ५ गोळ्या झाडल्या. नंदिनीला ४ गोळ्या लागल्या. तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नंदिनीच्या हत्येनंतर अरविंदने पोलिसांवरही गोळाबीराचा प्रयत्न केला होता. मात्र अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर पोलिसांनी अरविंदला पकडलं होतं.

नंदिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय होती. ती नेहमीच स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायची. फेसबुकवर तिची चांगली फॅन फॉलोइंग होती. नंदिनीने ४ दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक अकाउंटवर  तिचा बॉयफ्रेंड अंकुश पाठकचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत होते. हा व्हिडीओ पाहून अरविंदचा पारा चढला आणि त्याने नंदिनीला संपवण्याचा निर्णय घेतला.

चौकशीदरम्यान अरविंद परिहारने सांगितले की, नंदिनी इतर पुरुषांसोबत राहत असताना त्याला ब्लॅकमेल करत होती. अरविंदने तरुणासोबतचा तिचा व्हिडिओ समोर आला तेव्हा तो संतापला. या व्हिडिओमध्ये दोघेही वाढदिवसाची पार्टी साजरी करत होते. हत्येच्या वेळी हा मुलगा त्याच्यासोबत होता. मात्र, तो नंदिनीला त्याची वहिणी म्हणत होता.

दरम्यान, शुक्रवारी ग्वाल्हेरमधील रूपसिंग स्टेडियमबाहेर अरविंदने ३१५ बोरच्या पिस्तूलमधून एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी चार नंदिनीला लागल्या. पाचवी गोळी भिंतीवर लागली. अरविंद परिहारने पोलिसांना सांगितले की, तो २०२२ मध्ये एका पार्लरमध्ये नंदिनीला भेटला होता. त्याला ती आवडली.  दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत होते. नंतर त्यांनी पोस्टवर एकमेकांसाठी कमेंट लिहायला सुरुवात केली. प्रेम व्यक्त केल्यानंतर, दोघांनी २०२३ मध्ये लग्न केले. त्यावेळी नंदिनीला माहित होते की अरविंद आधीच विवाहित आहे, पण ती त्याच्या पत्नीमुळे खूश नव्हती. अरविंदलासुद्धा नंदिनीने तिच्या पतीला घटस्फोट दिल्याचे माहिती होती.

काही काळानंतर, नंदिनीला कळले की अरविंद गुन्हेगारी स्वभावाचा आहे. तर अरविंदला नंदिनीचे अनेक मुलांशी संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांविषयी विष ओकण्यास सुरुवात केली. अरविंदने नंदिनीचा ३ मुलांसोबतचा फोटो अपलोड केला आणि कमेंट केली की 'या नात्यांचे नाव काय आहे. इतक्या मुलांसोबत तू काय करते, जे याला गैरसमज करतात त्यांनी हे पहा आणि आजच कमेंट करा, असं अरविंदने म्हटलं होतं. याला उत्तर म्हणून नंदिनीने एका विवाहितेचा फोटो अपलोड केला होता. त्यावर, विवाहित असो वा घटस्फोटित, दोन्ही प्रकरणांमध्ये फक्त स्त्रीच बेघर होते. कोणीही पुरुषाचे घर हिसकावून घेत नाही, असं म्हटलं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस