मीरारोड - कंपनीत गुंतवणुक करुन दरमहा चांगला फायदा मिळवुन देतो सांगुन चौघा जणांनी १२ गुंतवणुकदारांना ५८ लाख ५५ हजारांना ठकवल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी केसरसिंग राजपुत (३२) रा. मानसी क्लासिक, जनता नगर, काशिमीरा यांचे प्लायवुडचे दुकान आहे. त्याच्या मुळच्या राजस्थान येथील गावा कडचा असणारा शंभुसिंह खरवड याच्याशी केसरसिंगचा परिचय होते. खरवड हा इलेक्ट्रीशियनचे काम करत होता. राईट इनव्हेस्टमेंट एन्ड सिक्युरीटीज नावाची कंपनी २०१६ पासुन चालवत असल्याचे सांगतीले. त्यात धर्मेश पुरोहित रा. सानोटा इमारत, मालवणी, मालाड हा संचालक तसेच तो स्वत:, त्याचा भाऊ बसंतसिंह खरवड व केसरसिंग राजपुत तीघेही रा. डिंबेश्वर चाळ, कांदिवली भागीदार असल्याचे शंभुसिंह म्हणाला होता.शंभुसिंहच्या सांगण्यावरुन गेल्या वर्षी त्याने ३ लाख गुंतवले होते. खरवड याने मोबाईल मध्ये त्याला अॅप डाऊनलोड करुन दिला. त्या मध्ये ३ लाख गुंतवलेले दिसले. पण नंतर अॅप मध्ये नफ्याचे १७ हजार ३०० रुपयेच दिसले. ३ लाख दिसलेच नाही. केसरसींग सह अन्य परिचीत निषांत अग्रवाल, राजा अरोरा, शिवम नंदा, लक्षमणसिंह राजपुत, , शंभुसिंह राजपुत, गोपालसिंह राजपुत, किसनसिंह राजपुत, प्रेमसिंह राजपुत, मनोहरसिंह राजपुत, रमेश भेड, काळुसिंह राजपुत, गंगा चौरसिया आदींनी देखील त्या चौघांच्या विश्वासावर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते.परंतु गुंतवलेल्या पैशांची माहिती मिळत नव्हती. त्यातच फेब्रुवारी महिन्यात शंभुसिंह आदींनी आपली कंपनी बुडाल्याचे सांगून लवकरच सर्वांचे पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. पण नंतर मात्र त्यांचे मोबाईल बंद आणि दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहित. अखेर त्या चौघांविरोधात ५८ लाख ५५ हजार रुपयांची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना ५८ लाखांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 21:37 IST
काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना ५८ लाखांना घातला गंडा
ठळक मुद्देशंभुसिंहच्या सांगण्यावरुन गेल्या वर्षी त्याने ३ लाख गुंतवले होते. अखेर त्या चौघांविरोधात ५८ लाख ५५ हजार रुपयांची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.