शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा हादरलं! ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:03 IST

'Drishyam'-Style Murder: २८ वर्षीय चमन देवी आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार

Nalasopara Crime News | लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशी आणि सोनम यांची एक बातमी प्रचंड चर्चेत होती. सोनमने आपला पती राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी प्रियकर राज कुशवाह याला सुपारी दिली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्रात नालासोपारा येथे असाच एक प्रकार घडला. नालासोपारा शहराच्या धानीवबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली. आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरला. इतकेच नव्हे तर त्या मृतदेहावर त्यावर नवीन टाईल्स लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्ह्याचा तपास करत आहे.

धानीवबागच्या गांगडीपाडा येथील साईशारदा वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या विजय चौहान (३४) यांची हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी चमन देवी (२८) आणि प्रियकर मोनू शर्मा (२०) याच्या मदतीने ही निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरला गेला. धक्कादायक म्हणजे मृतदेह पुरल्यावर त्यावर टाईल्स देखील लावण्यात आल्या. हा प्रकार १५ दिवसांनी उघड झाला. आरोपी पत्नी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्हार पोलीस तपास करत आहे.

कसे उघडकीस आले प्रकरण?

अखिलेश चौहान (२४) याने रविवारी रात्री भाऊ विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकर मोनू सोबत आरोपी चमन देवी पळून गेल्याची माहिती विजयचा भाऊ अखिलेश याने दिली. तसेच त्या परिसरातील मोबाईलवाला सर्वेश गिरी याचाही यात सहभाग असल्याचा आरोपही त्याने केला.

जमिनीतून वास येत असल्याने मृतदेह जमिनीत असल्याचे समजले. पण मनपा डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट आल्याशिवाय जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांची टीम घटनास्थळी असून तपास व आरोपींचा शोध घेत आहे.- जितेंद्र वनकोटी, (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईVasai Virarवसई विरारMumbai policeमुंबई पोलीस