शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Nalasopara Crime | वैयक्तिक वादातून कारवर फायरिंग, तलवारीने एकाच्या हाता-पायावर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 21:49 IST

जीवघेणा हल्ला हा डुक्करावरून झालेल्या वादातून झाला

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: वालीवच्या नाईकपाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास वैयक्तिक वादातून ४५ वर्षीय एकावर तलवारीने हातापायावर वार करण्यात आले आहे. तर त्याच्या कारवर फायरिंग करण्यात आली आहे. जखमींवर प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने वसईत खळबळ माजली आहे. वालीव पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यातील व गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास नाईकपाडा येथे राहणारे हरजित सिंग उर्फ दादू (४५) यांच्या कारवर फायरिंग करून ३ ते ४ आरोपींनी तलवारीने हाता-पायावर वार केले. हा जीवघेणा हल्ला हा डुक्करावरून झालेल्या वादातून झाला. तर आरोपी आणि जखमी हे नातेवाईक आहेत. तर आरोपींनी हल्ला करून जखमी हरजित यांना घटना स्थळावरून उचलून गाडीतून रेंज नाका येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सोडून गेल्याचेही सूत्रांकडून कळते. वसईतील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शिकलकर गँगवार सुरू तर झाला नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपाराFiringगोळीबार