शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील मुथुट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला; पोलिसांकडून ७ जण गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 16:28 IST

दरोडेखोराकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर्स जप्त 

सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-४ लालचक्की परिसरातील मुथुट फायनान्सवरील दरोड्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला असून ७ दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर आदी साहित्य जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ लालचक्की परिसरात मुथुट फायनान्स कार्यालय असून यामधून सोन्याची दागिने गहाण ठेवल्यावर कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्स कार्यालय मध्ये मोठे घबाळ मिळेल, या आक्षेतून मुथुट फायनान्स शेजारील गाळा (दुकान) काही जणांनी भाड्याने घेऊन त्याजागी फळांचा व्यवसाय सुरू केला. दुकानाची व मुथुट फायनान्स कार्यालयाची एक भिंत सामाहिक आहे. शनिवारी रात्री १२ वाजल्या नंतर फळांच्या दुकानात काही जणांच्या संशयास्पद हालचाली होत होत्या. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग करणारी गाडी गेली. त्यावेळी त्यांनी दुकानात होत असलेल्या संशयास्पद हालचाली टिपून सदर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. 

अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार मुथुट फायनान्स कार्यालय शेजारील बंद फळांच्या दुकानाचा अंदाज घेऊन, पोलिसांनी आत मध्ये असलेल्याना बाहेर येण्यास सांगितले. पोलिसांनी आपल्यांला घेरले याचा अंदाज आलेल्या दरोडेखोरा पैकी एकाने दुकानाचे शटर उघडले. पोलिसांनी जहीर अहमद, इमामुद्दीन कासीम शेख, जिजाऊ शेख, रामसिंग, काळू शेख, आदिम शेख अश्या ७ जणांना जेरबंद करून अटक केली. सर्व दरोडेखोर झारखंड, यूपी व नेपाळ येथील आहेत. त्यांच्याकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर, ऑक्सिजन गॅस सिलेंडर, हातोडे आदी साहित्य जप्त केले. सर्व सराहित गुन्हेगार असून देशाच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुथुट फायनान्स व फळाची सामाहिक भिंतीला चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर भगदाड पाडत असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला असून न्यायालयाने त्यांना ७ दिवसाची पोलीस कोठडी दिली. 

दरोडेखोरांकडून मिळणार मोठी माहिती - सहायक पोलीस आयुक्त डी टी टेळे 

विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला असून सर्व दरोडेखोर झारखंड, यूपी व नेपाळचे आहेत. देशात त्यांनी कुठे कुठे दरोडा टाकला याची माहिती घेतली जात असून मोठी माहिती उघड करण्यात पोलिसांना यश मिळणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस