महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या भस्म आरतीत हिंदू म्हणून सामील झालेल्या मुस्लिम तरुणाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कर्नाटकातील मोहम्मद युनूस मुल्ला हा मुंबईतील आपली मैत्रीण खुशबू यादवसोबत उज्जैनला आला होता. त्याच्याकडे अभिषेक दुबे या नावाचे आधार कार्ड होते. या आधारकार्डच्या आधारे त्याने मंदिरात प्रवेश केला. आरती करताना त्याला विधी नीट कळू शकल्या नाही, तेव्हा मंदिरातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून चौकशी केली. आधार कार्डच्या फोटोवरून चेहरा वेगळा असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे सापडलेले अभिषेक दुबे नावाचे आधारकार्ड मित्राचे असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी त्याच्या प्रेयसीच्या पालकांना उज्जैनला बोलावले आहे. खुशबूचे स्वत:ला मुंबईतील फॅशन डिझायनर असल्याचे सांगते. युनूस हा आपला कामगार असल्याचे ती सांगते. बुधवारी सकाळच्या भस्म आरतीमध्ये युनूसने अभिषेक दुबे या नावाने बुकिंग केले होते. खुशबूने युनूसचा भाऊ म्हणून ओळख करून दिली होती. मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा करूनही तरुणी त्याला आपला भाऊ म्हणत होती. युनूसचे मूळ आधार कार्ड बाहेर आल्यावर वास्तव समोर आले. पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाकालेश्वर मंदिरात हिंदू बनून घुसला मुस्लीम युवक; पुजाऱ्यांनी 'असा' पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 19:23 IST