मुंबई - संगीत दिग्दर्शक डबू सरदार मलिक (५६) हे मर्सिडीजमधून जुहू तारा रोड परिसरातून जात असताना, टकटक टोळीतील दोन ठगांनी त्यांना अडविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या मर्सिडीजमधून आयफोन चोरी केल्याची घटना जुहू तारा रोेड परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.मलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मर्सिडीजमधून जुहू तारा रोड येथून सांताक्रुझ चौपाटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.आयफोन चोरण्यात आला आहे, ही बाब मलिक यांच्या लक्षात येणार तोच, त्याच पद्धतीने त्याच मार्गावरील त्यांच्या शेजारील कारमधील रवींद्र काशीराम वाक्कर यांचाही मोबाइल पळविण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांचा गोंधळ उडाला.त्यांनी या प्रकरणी तात्काळ जुहू पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांनी केलेल्या वर्णनावरून पोलीस लुटारूंचा तपास करत आहेत. मलिक यांनी ‘ये जिंदगी का सफर’सारखा अल्बम व अनेक गाजलेल्या गाण्यांचे दिग्दर्शन केले आहेत. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांचे ते बंधू आहेत.
संगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:49 IST
या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
संगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार
ठळक मुद्दे दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली.ना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.मलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत.