शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

संघटित गुन्हेगारीचा विदर्भात खुनी खेळ; दोन वर्षांत पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 06:09 IST

सध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे.

संघटित टोळ्या, त्यांच्यातील वर्चस्वाचा खुनी संघर्ष, गावगुंडांमधील आपसी लढाया यामुळे विदर्भातील गुन्हेगारीचा ग्राफ गेल्या दोन-चार वर्षांत दिवसेंदिवस रक्तरंजित होत चालला आहे. गुन्हेगारांकडे अत्याधुनिक हत्यारे येत आहेत. चाकू-तलवारींचा जमाना गेला, आता बंदुका-कट्ट्यांनी वैरी संपवले जात आहेत. दोन वर्षांत विदर्भात पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर झाले. हेमंत नगराळे यांनी पोलीस महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेताच हिस्ट्रीशीटर, गावगुंड, टोळ्यांच्या बंदोबस्ताचे फर्मान काढले आहे. ते मूळचे विदर्भातील. त्यामुळे साहजिकच विदर्भातील गुन्हेगारीकडे त्यांचे खास लक्ष असेल. या पार्श्वभूमीवर विदर्भातील गुन्हेगारीची दोन वर्षांची ही एक झलक...

गोंदिया : २ वर्षांत ७० खून, ३२ खुनी हल्लेदोन वर्षांत संघटित गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून आणि आपसी वैमनस्यातून ७० खून पडले, तर ३२ जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बहुतांश खुनात देशी कट्ट्याचा वापर होतो. जिल्ह्यात रेतीमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात गँगवार होत असतात. गावठी दारू, गांजा, जुगार ते विदेशी नशेचा बाजार मांडून अनेक गुंड गडगंज झाले आहेत. १८ गुन्हेगार तडीपार झाले आहेत.

गांधी जिल्ह्याला गुन्हेगारीचा फासवर्धा जिल्ह्यात दोन वर्षांत संघटित गुन्हेगारीतून ६९ जण ठार झाले. ७० जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. कारवाईला न जुमानता वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात खून पडत आहेत. २०१९ मध्ये वर्चस्ववादातून ३५ जणांना तर २०२० मध्ये ३४ जणांना संपवले.

ज्या टोळीकडे बंदूक, त्या टोळीचे वर्चस्वसध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे. गुन्हेगारांकडून बंदूक हस्तगत करण्याच्या तुरळक कारवाया होतात. मात्र, बऱ्याच गुन्हेगारांकडील अवैध बंदुकींपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून