शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

खळबळजनक! बलात्काराचा बदला घेण्यासाठी महिलेने आधी युवकाचा गळा कापला अन् त्यानंतर गुप्तांगावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 12:27 IST

अटक केलेल्या आरोपी महिलेने दावा केला आहे की, हबीबुल्लाह नावाच्या युवकाने माझ्यावर बलात्कार केला होता.

ठळक मुद्देया घटनेचा तपास करताना पती-पत्नीबद्दल पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर पती-पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नाच्या दिवशी महिलेने युवकाना फोन करून भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर महिलेने पतीसोबत मिळून युवकाची हत्या केली

गिरीडीह – झारखंड येथील एका युवकाच्या हत्यांकांड प्रकरणाचा पोलिसांनी ३ दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणात पती-पत्नी दोघांना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. ज्या धारदार शस्त्राचा वापर हत्येसाठी करण्यात आला तेदेखील पोलिसांनी जप्त केले आहे. या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या पती-पत्नीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या महिलेने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

अटक केलेल्या आरोपी महिलेने दावा केला आहे की, हबीबुल्लाह नावाच्या युवकाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्यामुळे त्याची हत्या केली. महिलेने पतीला वाचवण्यासाठी अन्य २ युवकांची नावे घेतली आहेत. परंतु या युवकांवरील आरोपाचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे या दोघा युवकांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी हबीबुल्लाह हा आपल्या पत्नीला माहेरी सोडून गावी परत आला होता. तेव्हा गावात एका लग्नात सहभागी होण्यासाठी तो घराबाहेर पडला.

जेव्हा हबीबुल्लाह रात्री उशीर झाला तरी घरी परतला नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला. परंतु फोन बंद लागत होता. तेव्हा वडिलांना वाटलं की तो लग्नस्थळी राहिला असावा. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात हबीबुल्लाहचा मृतदेह सापडला. या घटनेने गावात खळबळ माजली. खुखरा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोस्टमोर्टमनंतर हबीबुल्लाहच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हबीबुल्लाहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेचा तपास करताना पती-पत्नीबद्दल पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर पती-पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. हबीबुल्लाहनं माझ्यावर बलात्कार केला होता त्यामुळे त्याची हत्या केल्याचा आरोप महिलेने केला. मात्र बलात्कार झाला असेल तर पोलिसांना माहिती का दिली नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. लग्नाच्या दिवशी महिलेने युवकाना फोन करून भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर महिलेने पतीसोबत मिळून युवकाची हत्या केली. ज्यादिवशी हबीबुल्लाहचा मृतदेह सापडला तेव्हा तो अंत्यंत वाईट स्थितीत होता. मयत व्यक्तीचा गळा कापण्यात आला होता तसेच त्याच्या गुप्तांगालाही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामुळे पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून जलदगतीने तपास केला.

वडिलांनी केली न्याय देण्याची मागणी

हबीबुल्लाहच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्याच्य्या वडिलांनी केली आहे. हबीबुल्लाहच्या मागे त्यांची एक वर्षाची मुलगी स्लामुन आणि पत्नी सादिकाच्या देखभालीची चिंता वडिलांना लागली आहे. हबीबुल्लाहची आई सध्या आजारी आहे. घरात आर्थिक तंगी सुरू आहे. माझा मुलगा जास्त शिकलेला नव्हता. गुजरातमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होता. लॉकडाऊन लागल्याने तो घरी परतला होता अशी माहिती वडिलांनी दिली.   

टॅग्स :Policeपोलिस