शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची गळा कापून केली हत्या; सीसीटीव्हीमुळे सापडला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:13 IST

मयुरीची हत्या करणाऱ्या आरोपी अमोल गणपत औधारे (28) याला पोलिसांनी अटक केले आहे.     

ठळक मुद्देसीसीटीव्हीमुळे खुनाचा गुन्हा 24 तासात उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील साईनाथ पेट्रोल पंपाच्या जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये रूम नंबर बी/302 मध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय मयुरी महेश मोरे हीची शनिवारी संध्याकाळी घरी एकटी असताना चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या झाली होती. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. पण तपासादरम्यान परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे खुनाचा गुन्हा 24 तासात उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर हत्या ही प्रेमप्रकरणामुळे झाली आहे. मयुरीची हत्या करणाऱ्या आरोपी अमोल गणपत औधारे (28) याला पोलिसांनी अटक केले आहे.         

मयुरीची हत्या झाल्यानंतर पती महेशने विरार पोलिसांत तक्रार दिल्यावर पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी घरी धाव घेऊन सीसीटीव्ही लागलेले पाहिल्यानंतर ऑपरेटर कडे जाऊन तपासणी केले असता खून झालेल्या दिवशी 27 ला अनोळखी एक जण रात्री 8 वाजता घरी येऊन गेल्याचे व दुसऱ्या दिवशी 28 ला सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी तोच अनोळखी तरुण सीसीटीव्ही केमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसले. पोलिसांनी महेशजवळ विचारपूस केल्यावर मयुरीच्या कामावरील एक तरुण नेहमी घरी येजा करायचा ही माहिती मिळाल्यावर त्याचे नाव व पत्ता घेऊन त्यादिशेने तपासाला सुरुवात केली. नालासोपारा येथे राहणाऱ्या अमोल गणपत औधारे (28) याने हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस त्याच्यामागावर होते आणि त्याला बोरिवली येथून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे गुन्ह्याबद्दल विचारणा केल्यावर हत्या केल्याची कबुली देत धक्कादायक माहिती दिली की, हत्येच्या दिवशी घरी गेल्यावर मला तू भेटायचे नाही, माझ्या घरी येऊ नकोस, दुसऱ्या इसमासोबत माझे प्रेमसंबंध जुळलेले आहे असे बोलल्यावर रागाच्या भरात चाकूने गळ्यावर वार केले.

मयुरीची हत्या झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज प्राप्त करून तपासाला सुरुवात करत पतिकडूनही माहिती मिळाल्यावर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम बनविण्यात आली होती. आरोपी अमोल गणपत औधारे याला बोरिवली येथून अटक केले असून वसई न्यायालयात  हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - अनिल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक