शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भोसरीत पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:32 IST

आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी यांच्यात सतत वाद होत असत...

पिंपरी : मद्यपी पती व पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. यात पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केला. भोसरी येथे सोमवारी (दि. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी अतिष काळे (वय ३५, रा. गुळवे वस्ती, भोसरी), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अतिष ऊर्र्फ  पप्पू काळे, असे आरोपी पतीचे नाव आहे.    आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी हे दोघेही सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गुळवेवस्ती येथील त्यांच्या घरी आले. दोघेही घरात असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. यात आरोपी अतिष याने कावेरी यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे कावेरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेला. याबाबत माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कावेरी यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.     दरम्यान, कावेरी हिच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. तिला ११ व आठ वर्षांची अशा दोन मुली असताना आरोपी अतिष याच्याशी तिने दुसरे लग्न केले. कावेरी हिच्याशी लग्न करण्यापूर्वी आरोपी अतिष त्याच्या आईवडिलांसोबत भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर येथे रहात होता. लग्नानंतर तो पत्नी कावेरी हिच्यासोबत भोसरीतील गुळवेवस्ती येथे रहात होता. काळेवाडीतही त्यांचे नातेवाईक आहेत. 

पती-पत्नी मद्यपी?आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी यांच्यात सतत वाद होत असत. त्याचप्रमाणे दोघेही सोमवारी मद्यपान करून आले. दोघेही नशेत असताना त्यांचे भाडण झाले. यात कावेरी हिचा खून झाला, असे काही स्थानिकांकडून सांगण्यात येत होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस