शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वरंधा घाटात नेऊन मित्राचा काढला काटा, दीड वर्षानंतर लागला खुनाचा छडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 18:47 IST

Pune Crime News : मित्राला फिरायला नेऊन वरंधा घाटात दारू पाजून कोयत्याने वार करीत त्याचा खुन केला़ त्यानंतर मृतदेह खोल दरीत टाकला होता़

 

पुणे - दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत दीड वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली़ मित्राला फिरायला नेऊन वरंधा घाटात दारू पाजून कोयत्याने वार करीत त्याचा खुन केला़ त्यानंतर मृतदेह खोल दरीत टाकला होता़ पोलिसांनी ट्रेकरच्या सहाय्याने तब्बल ६०० फूट खोलदरीतून मृताची हाडे हस्तगत केली असून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, 

द अल्पायनिस्ट गिर्यारोहण संस्थेने तपासासाठी विशेष मदत केली. गणेश यशवंत चव्हाण (वय २३), विशाल श्रीकांत जाधव (वय ३२), सुनील शंकरवसवे (वय २३, सर्व रा़ बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत़ त्यांचा साथीदार दशरथ अरुण शिंदे (रा़ कासुर्डी) हा पळून गेला होता़ दीपकबापू वाडकर (वय २१, रा़ बिबवेवाडी) यांचा त्यांनी खून केला होता.दीपक वाडकर हा आरोपींना वारंवार शिवीगाळ करीत व जीवे मारण्याची धमकी देत होता़ तसेच त्यांच्याबरोबर आरोपींचे पैशावरुन वादही होते़ त्यामुळेदीपकने आपल्याला मारण्यापेक्षा आपणच त्याचा काटा काढू असे त्यांनी ठरविले़ त्यानुसार त्यांनी वाडकर याला वरंधा घाटात फिरायला नेले़ तेथे त्याला दारु पाजून कोयत्याने वार करुन खुन केला़ त्यानंतर त्याला खोल दरीत फेकून दिले़ ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी चौकशी केल्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी दीपक हरविल्याची तक्रार दिल्याचे आढळून आले़ आरोपींच्या सांगण्यानुसार द अल्पायनिस्ट गिर्यारोहणसंस्थेचे ट्रेकर्स भगवान चवले, अक्षय शेलार, अक्षय भोकरे, सुनील बलकवडे, सुमित गावडे यांनी वरंधा घाटात सुमारे ६०० फूट खोल दरीत उतरुन त्यांनीझाडामध्ये तपासणी केल्यावर त्यांना मानवी शरीराचे कुजलेल्या स्थितीतील अवशेष मिळून आले. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक जयंत जाधव, उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार आंब्रे, उसूलकर पोलीस कर्मचारी तारु, भिलारे, भिलारे, चोरमले, फरांदे, शेख, मदने यांनी ही कारवाई केली़तोंडावरील व्रणामुळे उघडकीस आला खुनदरोड्याच्या तयारी असताना पकडलेल्या सुनिल वसवे याच्या तोंडावर व्रण होता़ त्याविषयी पोलिसांनी विचारल्यावर त्याने अगोदर अपघातात लागले होते,अशी थातुरमाथुर कारणे सांगितली़ पण, त्यामुळे पोलिसांचे समाधान झाले नाही़ त्यांनी हे आरोपी रहात असलेल्या परिसरात चौकशी केली़ तेव्हा त्यांना कुणकुण लागली होती़ अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यावर शेवटी त्यांनी दीपक वाडकर याचा खुन केल्याची कबुली दिली़ दीपक वाडकर आणि आरोपी एकाच ठिकाणी राहतात़ त्यांच्यात कुरबुरी होत्या़ त्यातून त्यांनी दीपकचा काटा काढायचे ठरविले़ त्याला एकाचा गेम करायचा आहे, असे सांगून मोबाईल घरी ठेवायला सांगितले़ १५ मार्च २०१९ रोजी त्याला घेऊन ते वरंधा घाटात गेले़ तेथे ते दारु पिले़ मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांचे इतरसाथीदार आल्याचे पाहिल्यावर विशाल जाधव याने दीपकवर वार केले़ जखमी झाल्यावर तो पळून जाऊ लागला़  तेव्हा सुनिल वसवे याने त्याला पकडले़सुनिल आणि दीपक या दोघांचे शर्ट एकाच रंगाचे असल्याने इतरांनी चुकून दीपक  ऐवजी सुनिलच्याच तोंडावर वार केला होता़ त्यानंतर त्यांनी दीपकचा खुन करुन मृतदेह दरीत ढकलून दिला़ जवळच्या गावात जाऊन तोंडावरील जखमेवर उपचार करुन ते परत पुण्यात परतले होते़ मात्र, दीड वर्षापूर्वीचा हा व्रण तोंडावर तसाच राहिला होता़ त्यावरुन  पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे