पुसद (यवतमाळ) : येथील बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री तिघांनी शेख आसिफ शेख हानिफ (२७) रा.पार्वतीनगर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने भोसकले. यात शेख आसिफ ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.शेख आसिफ शेख हानिफ याच्यावर गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख सलाम (२५), शेख सादिक शेख सलाम (१९) आणि शेख इम्रान शेख नवाब (२०) सर्व रा.कानडे ले-आऊट यांनी जुन्या भांडणातून हल्ला केला. तिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेख अलताफ याने चाकूने पोटावर वार केले. या मारहाणीत शेख आसिफचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख सलीम शेख मुसा (२७) रा.दुधे ले-आऊट याने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या प्रकरणाची सूत्रे स्वत:कडे घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा, दीपक ताटे, कैलास ससाने, दिगांबर घुमनर, नंदकुमार चौधरी, जलाल शेख, माधव आत्राम, दयानंद जांभळे, अभिषेक इंगळे, कुणाल रुडे, प्रशांत स्थूल, अनुप हातोलकर, मनोज कदम, कैलास मुकाडे आदींनी आरोपींना तातडीने अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पुसद येथे युवकाची हत्या; तिघांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:08 IST
गुरुवारी रात्री बसस्थानकानजीक घडली घटना
पुसद येथे युवकाची हत्या; तिघांना ठोकल्या बेड्या
ठळक मुद्देतिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.