शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

लातुरमध्ये चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 13:39 IST

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. कल्याण नेहरकर करीत आहेत.

लातूर : शहरातील विक्रम नगर येथे क्षुल्लक कारणावरून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शाहू कापसे (रा. प्रकाश नगर, लातूर) यांचा मुलगा अशोक कापसे (26) रविवारी रात्री उशिरा आपल्या मित्राला घेऊन विक्रम नगर येथे गेला होता. याचदरम्यान अजय पिसाळ आणि विजय पिसाळ यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून त्याची बाचाबाची झाली. नंतर याचे पर्यावसान चाकू हल्ल्यात झाले. यात अशोक कापसे याचा मृत्यू झाला तर मित्र मोहित हा गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. कल्याण नेहरकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे