शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तरुणाचा खून, पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:36 IST

सोमवारी सायंकाळी साखरपुडा असताना आदल्या दिवशी सायंकाळी तरुणावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्याची धक्कादायक घटना सायंकाळी कर्वेनगरमध्ये घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सोमवारी सायंकाळी साखरपुडा असताना आदल्या दिवशी सायंकाळी तरुणावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्याची धक्कादायक घटना सायंकाळी कर्वेनगरमध्ये घडली.

अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणुकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता कर्वेनगरमधील शक्ती चौक परिसरात घडली. खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव याचा सोमवारी सायंकाळी साखरपुडा होता. त्याची बहीण फक्कड हॉटेल येथे स्वयंपाकी म्हणून काम करते. तिला सोडायला अनिल दुचाकीवरुन लक्ष्मीनगर परिसरात आला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी जात होता. शक्ती चौक येथे तो आला असताना तिघा जणांनी अचानकपणे त्याच्यावर तलवारीने डोक्यावर, खांद्यावर सपासप वार केले. तेव्हा त्याने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काही अंतर तो धावत गेला. त्याच्यामागोमाग हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्याच्यावर वार केले. त्यात तो तेथेच कोसळला. तेथेच त्याचा मृत्यु झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पाठोपाठ अलंकार पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी अनिल जाधव याच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.

राजेंद्र जाधव याच्या आईचे ६ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याला ४ बहिणी असून त्यातील तिघींचा विवाह झाला आहे. वडिलांशी पटत नसल्याने तो बहिणीकडे रहात होता. तो मिळेल ते काम करीत होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे