शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आधी डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; नंतर मृतदेह जाळून नदीत टाकली राख; पिंपरीतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 14:00 IST

मारहाण केल्याच्या रागातून खून, तीन महिन्यांनंतर गुन्ह्याची उकल 

ठळक मुद्देपिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : भांडणातून मारहाण झाल्याचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकून पुरावा नष्ट केला. खून झाल्यानंतर तीन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.जसबीरसिंग ऊर्फ बिल्लू ऊर्फ विक्की गुलजारसिंग विरदी (वय १९, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निरज अशोक जांगयानी (वय २६, मेन बजार, पिंपरी), ललीत लालचंद ठाकूर (वय २१, रा. वैष्णोदेवी मंदिरामागे, पिंपरी), योगेश केशव पंजवाणी (वय ३१, रा. संजय लायब्ररी लेन, गुरुव्दाराजवळ, पिंपरी) आणि हरजोतसिंग रणजितसिंग लोहीट (वय २२, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसबीरसिंग विरदी आणि त्याचा भाऊ सनी गुलजारसिंग विरदी या दोघांनी आरोपी निरज जांगयानी याला मारहाण केली होती. दि. ७ मार्च २०२० रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी निरज जांगयानी याने त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर निरज जांगयानी आणि इतर आरोपी पिंपरी येथील डेअरी फार्म रोड येथील गोठ्यामध्ये दारू पित बसले होते. दरम्यान आरोपी हरजोतसिंग लोहीट हा रात्री बाराच्या सुमारास जसबीरसिंग विरदी याला घेण्यासाठी पिंपरी येथील रिव्हर रोड येथे आला. तेथून आरोपी हरजोतसिंग हा जसबिरसिंग विरदी याला घेऊन डेअरी फार्म रोड येथील गोठ्यात रात्री साडेबाराच्या सुमारास पोहचला. तेथे दारू पित असलेला आरोपी निरज जांगयानी व इतर आरोपी यांनी जसबीरसिंग याचा गळा दाबून व त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर गोठ्यातील चारा, कचपान, वाळलेली काटके तसेच वाळलेले शेण टाकून त्याचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर त्याची राख दापोडी येथे पुलावरून नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केला. 

बेपत्ता झाल्याची मार्चमध्ये केली होती नोंददरम्यान, जसबीरसिंग विरदी हा दि. ७ मार्च रोजी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे नोंद केली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनPoliceपोलिसArrestअटक