शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:00 IST

अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम संबंधात अडसर ठरल्यामुळे तरुणाने आपल्या मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री वाठोडात घडली आहे.

ठळक मुद्देसल्ला देणे पडले महागात : वाठोडात घडली होती घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम संबंधात अडसर ठरल्यामुळे तरुणाने आपल्या मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री वाठोडात घडली आहे. आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे पोलीस आरोपीची माहिती देणे टाळत आहेत.आरोपी विकास नागोसे आहे. मंगळवारी रात्री गंगा सेलिब्रेशनजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. रात्री उशिरा त्याची ओळख पटली. तो अनमोलनगर येथील रहिवासी हिमांशु मनोहर डेंगे (२२) आहे. तो हिमांशु कुलर कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. विकास वाठोडात राहतो. तो मजुरी करतो. त्याची काही दिवसांपूर्वी हिमांशु सोबत मैत्री झाली. त्याची हिमांशुच्या घरी ये-जा होती. परिसरात एक १५ वर्षाची विद्यार्थिनी राहते. तिची हिमांशुसोबत ओळख होती. विद्यार्थिनीनुसार ती हिमांशुला आपला मानत होती. दरम्यान विकासची नजर या विद्यार्थिनीवर गेली. त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद न दिल्यावरही तो तिच्या मागे लागला होता. तिने ही बाब हिमांशुला सांगितली. हिमांशुने विकासला तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विकासला विद्यार्थिनी आणि हिमांशुचे संबंध असल्याची शंका आली. त्याने दोन-तीन वेळा हिमांशुसोबत वाद घातला. मंगळवारी रात्री ८.३० वाजता गंगा सेलिब्रेशनच्या समोर दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान विकासने हिमांशुचा खून केला. खुनानंतर तो मध्य प्रदेशात निघून गेला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठविण्यात आले. आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. विद्यार्थिनी आणि हिमांशुच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता एकतर्फी प्रेमात विद्यार्थिनीपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्यामुळे हिमांशुचा विकासने खून केल्याचा संशय आहे. वाठोडा पोलीस रात्री उशिरापर्यंत विकासचा शोध घेत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून