शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:22 IST

नागपूर - पांढुर्णा महामार्गावरील सावळी शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर - केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - पांढुर्णा (मध्य प्रदेश) महामार्गावरील सावळी (मोहतकर) शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी (दि. १३) सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा डोक्यावर दगड व शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिचा इतरत्र खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या शिवारात फेकला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली.  

खुशी जगजित परिहार, रा. हिंगणा असे मृत तरुणीचे नाव असून, ती अंदाजे १९ ते २१ वर्षे वयाची आहे. तिला ‘मॉडेलिंग’ची आवड होती. मात्र, ती तिच्या आईवडिलोसोबत न राहता वेगळी राहायची. शिवाय, आईवडिलांनीही तिच्याशी संपर्क तोडला होता. मध्यंतरी ती अशरफ अख्तर शेख (२८, रा. गिट्टीखदान, नागपूर) याच्या संपर्कात आली आणि दोघेही गिट्टीखदान, नागपूर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. अशरफ हादेखील त्याच्या आईवडिलांपासून वेगळा राहायचा. मात्र, तो त्यांच्या संपर्कात होता.दरम्यान, तिचे दुस-यासोबत ‘अफेयर’ असल्याचा अशरफला खात्रीलायक संशय होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यात भांडणे व्हायची. त्यातच तिचा शनिवारी सकाळी सावळी (मोहतकर) शिवारात मृतदेह आढळून आला. तिला केस पकडून किमान १५ फुटांपर्यंत नेल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे तिचा एक बूट पायात होता तर दुसरा एक फूट उंचावर पडला होता. या मार्गावर रक्ताचे नमुने आणि तिचे केस तसेच घटनास्थळी एक फूट लांब वेणी आढळून आली. त्यामुळे तिचा इतरत्र खून करून मृतदेह कारने या ठिकाणी आणून फेकला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी केळवद पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर