Murder of a woman by calling husband when he was playing cards | खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या
खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या

ठळक मुद्देया प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्या करणाऱ्या बाळाराम दिवे याला अटक केली आहे.संतापलेल्या बाळारामने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला मारहाण केली.

डोंबिवली - पत्ते खेळताना बोलवल्याने संतापलेल्या एकाने महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्या करणाऱ्या बाळाराम दिवे याला अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील उसरघर गाव येथील चिंतामण पाटील यांच्या वीटभट्टीवरील खोलीत बाळाराम दिवे आणि यमुना नावाची महिला राहते. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बाळाराम पत्ते खेळत होता. याच दरम्यान यमुना यांनी बाळरामला बोलावले. त्यामुळे संतापलेल्या बाळारामने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिंतामण पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बाळारामविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) नासीर कुलकर्णी करीत आहेत..


Web Title: Murder of a woman by calling husband when he was playing cards
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.